Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “चाकणकर पुरावे नष्ट करतील…”, अशोक खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट
Top News

“चाकणकर पुरावे नष्ट करतील…”, अशोक खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट

Ashok Kharat Case | नाशिकमधील (Nashik) ज्योतिषी अशोक खरातच्या (Ashok Kharat) प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून आणि SIT कडून कसून तपास केला जात आहे. तसेच राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप अशोक खरातवर करण्यात आला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलिसांनी खरातच्या फार्महाऊसवर केलेल्या तपासात त्यांना एक पेनड्राईव्ह सापडला असून त्यात 58 आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई

रूपाली ठोंबरे पाटील यांनी नेमके काय आरोप केले?

या प्रकरणी आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत रूपाली ठोंबरे पाटलांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. अशोक खरात प्रकरणातील पुरावे चाकणकर नष्ट करतील, असा थेट आरोप रूपाली ठोंबरेंनी केला आहे.

पत्रकार परिषदेत रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय खरात प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. हा विषय कोणत्या जातीचा किंवा पक्षाचा नसून महिलांचा आहे.

अशोक खरात प्रकरणाची वाचा 1 वर्षांपूर्वी फोडली होती. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टवर आहेत, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नव्हती का? खरातच्या पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडलेत, म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? असा सवाल रूपाली ठोंबरेंनी उपस्थित केला.

पूर्ण राज्यात आंदोलन करू, रूपाली ठोंबरेंचा इशारा

मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कानावर हे प्रकरण टाकणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर सुनेत्रा पवार योग्य निर्णय घेतील. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. या प्रकरणामध्ये कोणत्याही पक्षाचा संबंध नाहीये. त्यामुळे अजितदादांच्या सर्व लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत याची हमी नेत्यांनी दिली पाहीजे, असंही रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

तसंच रूपाली चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही पूर्ण राज्यात आंदोलन करू, असा थेट इशारा देखील रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts