Russian Oil Tanker | नुकतीच भारताला (India) दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. रशियाहून (Russia) कच्चे तेल घेऊन जाणारा एक टँकर दक्षिण चीन (China) समुद्रातून परत फिरला असून आता तो भारताच्या दिशेने वळला आहे. सध्या मध्यपूर्वेतील युद्धामुळे अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपल्याला तेल कसे मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
रशियाहून आलेले जहाज चीनकडे न जाता भारताकडे वळाले
अशातच आता रशियाहून आलेला एक तेलाचा टँकर चीनच्या बंदराकडे निघाला होता, मात्र या टँकरने अचानक आपला मार्ग बदलत भारताच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे. रशियाहून आलेले हे जहाज आता भारताकडे येत आहे. रशियाने आपल्या ‘ब्लॅक गोल्ड’चा अर्थातच कच्चा तेलाचा पुरवठा चीनला न करत भारताला केल्यामुळे जागतिक बाजारात एकच खळबळ उडाली आहे.
रशियाहून आलेल्या टँकर सुरूवातील चीनच्या बंदराकडे जाण्यासाठि नियोजित केला होता. मात्र, सॅटलाईट ट्रॅकिंग डेटावरून असं दिसून आलं की, रशियाहून आलेले हे जहाज भारताचा समुद्र पार करून साऊथ चायना सीमेमध्ये पोहोचले होते. पण या जहाजाने अचानक यू-टर्न घेतला आणि ते भारताच्या बंदराकडे येण्यास वळले आहे. त्यामुळे भारताला आता मोठा दिलासा मिळाला आहे.
रशियाने चीनला दिला मोठा धक्का
रशियाहून आलेले जहाज चीनकडे न येता अचानक भारताकडे वळल्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनसाठी हा आर्थिक तसेच राजनैतिक धक्का मानला जात आहे. तर भारताच्या तेल कंपन्यांनी रशियन कच्चा तेलासाठी चीनच्या तुलनेत अधिक जास्त दर आणि सुलभ पेमेंट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे हे जहाज भारताकडे वळले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.
व्होर्टेक्सा लिमिटेडच्या माहितीनुसार, रशियन तेल वाहून नेणाऱ्या किमान सात टँकर्सनी प्रवासादरम्यान आपला मार्ग चीनवरून बदलून भारताकडे वळवला आहे. तसेच रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी आता सर्व प्रमुख भारतीय रिफायनर्स बाजारात सक्रिय झाले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भारतीय जहाज ‘नंदा देवी’ (Nanda Devi Ship) हे गुजरातच्या वडीनार बंदरामध्ये दाखल झाले आहे. या जहाजामधून एलपीजी गॅस हस्तांतरित केला जातो. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून आता भारतात निर्माण झालेली गॅसची टंचाई देखील आता संपणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.












