Aashta Nagar Parishad Strong Room Chaos : नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर राज्यात २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची तारीख २१ डिसेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मतदान पेट्या सुरक्षित ठिकाणी चोख बंदोबस्तामध्ये ठेवणं हे प्रशासनापुढे मोठं आव्हान असणार आहे. त्यातच आता सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर तुफान राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जमले असून सर्वत्र गोंधळ उडाला आहे. मतदार यादी आणि प्रत्यक्ष मतदारांच्या आकड्यांमध्ये जवळपास ३ हजार मतांचा फरक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करून सर्वांना शांत राहण्याच आवाहन केलं.
आष्टा नगरपरिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हाॅलसमोर आष्टा मधील बहुंसख्य नागरीक जमा झाले आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर झालेल्या आकडेवाडीत जपळपास २ हजारांपेक्षा अधिक तफावत असल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा – राज्यात किती ठिकाणी किती झाले मतदान; जाणून घ्या आकडेवारी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आष्टा नगरपरिषदेत एकूण मतदार संख्या ३० हजार ५७४ एवढी असून, झालेलं मतदान २२ हजार ८६४ आहे. मात्र, नगरपरिषदेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये जवळपास २ हजारांपेक्षा अधिक मतांचा फरक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हे पूर्णपणे चूक आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, एकूण मतदार संख्या ३३ हजार ३२८ असल्याचे सांगण्यात आलं आहे.
१ हजार ३११ मतदार असताना ४ हजार ७७ मतदार संख्या दाखवण्यात आली
एका प्रभागात १ हजार ३११ मतदार असताना ४ हजार ७७ मतदार संख्या असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये एकूण ३ हजार ५६ मतदार संख्या आहे. त्यापैकी ३ हजार ३९४ एवढं मतदान झालं. पण संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, इथं केवळ १ हजार ७९५ मतदान झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासारख्या अनेक त्रुटी असल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे स्ट्राँग रुमबाहेर जाऊन या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
पत्रकारांच्या ग्रुपमधील आणि आयोगाला पाठवलेल्या आकडेवारीत तफावत
पत्रकारांच्या ग्रुपमधील आकडेवारी आणि एकूण मतदानाची खरी आकडेवारी यात काही प्रमाणात तफावत आहे. त्यावरून हा विषय चिघळला आहे. मात्र, आम्ही जिल्हा निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला जी आकडेवारी दिली आहे, ती नमुमा व्हीएम ३ नुसार असल्याचं कळवलं आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. केवळ संभ्रम झालेला असून तो संभ्रम दूर करण्यासाठीच आपण इथं आलोय, अशी माहिती निवडणूक अधिकार्याने दिली आहे.












