Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • गुजरातमध्ये आपत्तीची चाहूल? राजकोटमध्ये 11 तासांत सात भूकंपाचे धक्के, शाळांना सुट्टी
Top News

गुजरातमध्ये आपत्तीची चाहूल? राजकोटमध्ये 11 तासांत सात भूकंपाचे धक्के, शाळांना सुट्टी

Earthquakes In Rajkot

Earthquakes In Rajkot : शुक्रवारी गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील जेतपूर, धोराजी, उपलेटा आणि आसपासच्या ग्रामीण भागात भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. सततच्या भूकंपांमुळं, स्थानिक प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. भूकंप संशोधन संस्थेच्या (ISR) माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वात मोठा भूकंप सकाळी 6:19 वाजता आला, ज्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतर, सकाळी 8:34 पर्यंत एकूण 7 भूकंपाचे धक्के जाणवले.

सकाळी झालेली भूकंपांची मालिका :

सकाळी 6:19 – 3.8 तीव्रतेचा भूकंप (सर्वात तीव्र हादरा)
सकाळी 6:56 – 2.9 तीव्रतेचा भूकंप
सकाळी 6:58 – 3.2 तीव्रतेचा भूकंप
सकाळी 7:10 – 2.9 तीव्रतेचा भूकंप
सकाळी 7:13 – 2.9 तीव्रतेचा भूकंप
सकाळी 7:33 – 2.7 तीव्रतेचा भूकंप
सकाळी 8:34 – आणखी एक भूकंप जाणवला

भूकंपाचे केंद्र आणि खोली :

आयएसआरनुसार, या भूकंपांचे केंद्र प्रामुख्यानं उपलेटापासून 27 ते 30 किलोमीटर अंतरावर पूर्व-ईशान्य (ENE) दिशेनं होतं. गुजरातमधील राजकोट इथं झालेल्या या भूकंपाची खोली 6.1 किलोमीटर ते 13.6 किलोमीटर होती. यापूर्वी, गुरुवारी रात्री 8:43 वाजता याच भागात 3.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.

कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही :

जेतपूर, धोराजी आणि उपलेटा या ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळं घाबरलेले रहिवासी घरात राहण्याऐवजी रस्त्यावर आणि शेतात पळून गेले. मात्र, या भूकंपाच्या हालचालींमुळं आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही हे दिलासादायक आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लोकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts