Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
Top News

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Shivsena Shinde Group Leader Arrest | नुकतीच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्ह्याध्यक्ष बाबू सुब्रमण्यम कांबळतला (Babu Subramanyam Kambalat) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा –  भोंदूबाबा खरातचा नवा कारनामा; शाकाहारी भक्तांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा मासा, झाला धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्ह्याध्यक्ष बाबू सुब्रमण्यम कांबळत हा मागील 10 वर्षांपासून फरार होता. तर बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर बाबू कांबळतला आष्टी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील पवन ऊर्जा प्रकल्पावर काम करणाऱ्या मजूर अनिल म्हस्के यांच्यावर 12 जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात अनिल म्हस्के हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना 2016 साली घडली होती. या प्रकरणामध्ये बाबू सुब्रमण्यम कांबळत हा मुख्य आरोपी होता. तर अनिल म्हस्के यांच्यावर हल्ला केल्यानंतर कांबळतसह सर्व आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी अंभोर पोलीस स्थानकात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी कांबळत हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. तर मंगळवारी (31 मार्च) पोलिसांनी सापळा रचून कांबळतला अटक केली. या प्रकरणातील 11 आरोपींना पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या होत्या. तर आता कांबळतलाही ताब्यात घेतले आहे.

बाबू कांबळत हा फरार असताना देखील त्याची राजकीय कारकिर्द सुरू होती. तो फरार असतानाही अहिल्यानगरचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. तो अनेक ठिकाणी दिसत होता, प्रचार सभांमध्ये दिसत होता. मात्र, तरीही पोलीस त्याला अटक करत नव्हते त्यामुळे यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. अशातच आता पोलिसांनी कांबळतला अटक केली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts