Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती स्थिर; पलाशनंही घेतले उपचार
Top News

स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती स्थिर; पलाशनंही घेतले उपचार

Smriti Mandhana standing with her husband and Palash Muchhal, representing the latest health-related update

Smriti Mandhana father health update : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा विवाह सोहळा लांबणीवर पडला आहे. रविवारी स्मृतीच्या वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लग्न सोहळा पुढं ढकलण्यात आला आहे. तिच्या वडिलांवर सध्या सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आला आहे. दरम्यान स्मृतीच्या वडिलांनंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल याची देखील तब्येत काल बिघडली होती. मात्र खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन पलाश हा हॉटेलकडे रात्री रवाना झाला. दरम्यान स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांच्या प्रकृतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असून त्यानंतरच स्मृतीच्या विवाहाबाबत पुढचा निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ डिलीट केल्यानं चर्चा :

दरम्यान या सगळ्या घटनेनंतर स्मृती मंधानाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन साखरपुड्याच्या बाबतीत करण्यात आलेला एक व्हिडिओ डिलीट झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. रात्री उशिरा स्मृती मंधाना हिनं तिच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया हँडल वरुन साखरपुढ्याच्या बाबतीत ‘समजो होई गया’या गाण्यावर बनवलेलं एक रील हटवल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे स्मृती मांधाना किंवा तिच्या कुटुंबाकडून काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.

हे ही वाचा : स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका! लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला.

लग्नाची तयारी सुरु असताना आला हर्ट अटॅक :

दरम्यान रविवारी सांगलीच्या समडोळी रोडवरील मंधाना फार्म हाऊसवर स्मृती व पलाश यांचा विवाह सोहळ्याची तयारी सुरु असताना स्मृती मंधानाचे वडिल श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तात्काळ सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी करण्यात दाखल आलं. तसंच रुग्णालयामध्ये स्मृती मंधाना व कुटुंबीयही दाखल झाले होते. या घटनेमुळं लग्न स्थळाच्या ठिकाणावरुन येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवण्यात आलं. तसंच लग्न स्थळाच्या ठिकाणी डेकोरेशन काढण्याचंही काम सुरु असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळं रविवारी होणारा लग्न सोहळा पुढं ढकलण्यात आल्याचं मॅनेजर तोहीन मिश्रा यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts