फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या असून, त्यांनी आज फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. या प्रकरणात माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अंधारे यांनी ‘ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा’ आरोप केला आहे. अंधारे यांनी निंबाळकरांवर प्रशासकीय दहशत निर्माण केल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मोर्चात पीडित डॉक्टरचे वडीलही सहभागी झाले आहेत. “इलाका तुम्हारा धमाका हमारा” ही आपला स्टाईल असल्याचे सांगत, अंधारे यांनी रणजित निंबाळकर यांना चर्चेसाठी थेट आव्हान दिले आहे. ही घटना सातारा प्रकरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली नाही. माझी भूमिका मी आधी मांडली आहे. जे पत्र लिहले आहे ते सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. पीडितेच्या नातेवाईक यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. याप्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या माध्यमातून करावी. जेणेकरुन याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
एसआयटी नेमल्याचे वृत्त खोटे
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती (एसआयटी) नेमल्याचे वृत्त खोटे आहे. राज्य सरकारने या प्रकरणात केवळ देखरेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक केली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची माहिती दिली.
हे ही वाचा – England train attack : इंग्लंडमध्ये धावत्या ट्रेनमध्ये अनेक जणांवर चाकू हल्ला; दहा जण जखमी
मार्ड संघटना आक्रमक
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून मार्ड संघटना आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मार्ड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. डॉ संपदा मुंडे यांना न्याय द्या या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. एकच वेळी वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
खा. सुप्रिया सुळे यानी घेतली पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. “या भगिनीस न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरु राहील याची ग्वाही त्यांनी पिडीत कुटुंबियांना दिली. अशा संवेदनशील प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अतिशय जपून विधाने करणे आवश्यक असते. परंतु सत्ताधाऱ्यांकडून होणारी विधाने असंवेदशील, दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी आहेत. डॉ संपदा यांच्या मोबाईलचा सीडीआर लीक कसा झाला हा प्रश्न आहे. त्यांची आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वशक्तीनिशी मुंडे कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत. महाराष्ट्राच्या लेकीवर अन्याय करणाऱ्याला जर कुणी वाचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाही,” अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी पिडीत कुटुंबियांना दिली.
फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या भगिनीस न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरु राहील याची ग्वाही या कुटुंबियांना दिली. अशा संवेदनशील प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अतिशय जपून विधाने करणे आवश्यक… pic.twitter.com/b9sgjK3899
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2025











