Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “चाकणकर स्वत: तंत्र, मंत्र विद्या करायच्या”, सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; म्हणाल्या, अमावस्येला त्यांनी…
Top News

“चाकणकर स्वत: तंत्र, मंत्र विद्या करायच्या”, सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; म्हणाल्या, अमावस्येला त्यांनी…

Sushma Andhare On Rupali Chakankar | नाशिकमध्ये (Nashik) सध्या एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा सर्वांसमोर आला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. रूपाली चाकणकर आणि आरोपी अशोक खरात यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते, त्यामुळे चाकणकरांवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका केली जात आहे. यामध्ये आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

हेही वाचा – रुपाली चाकणकर फरार? रुपाली पाटील ठोंबरे यांची खळबळजनक पोस्ट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुषमा अंधारेंनी नेमके काय आरोप केले?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर या अशोक खरातला पाठीशी घालत होत्या. ज्योतिषी असणं सागणं वेगळी गोष्ट आहे आणि तंत्र-मंत्र विद्या करणं ही गोष्ट वेगळी आहे. पण एकिकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची कधीही पूजा करत नाही. उलट माझे यजमानच माझी पूजा करतात, असं सांगणाऱ्या रूपाली चाकणकर दुसरीकडे मात्र त्यांच्या पदराने त्या माणसाचे पाय पुसत होत्या, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.

सध्या ज्या बाई राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका कापून तंत्र-मंत्र करतात, अशी माहिती पीडित महिलांनी दिलीये. तसेच सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यान चाकणकरांच्या हातावर जखम होती. हा प्रकार खूप गंभीर असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या कृती आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, पीडित महिलांसोबत मी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या महिलांनी मला सांगितलं की, जेव्हा अशोक खरातचे वडिल वारले होते तेव्हा चाकणकर होत्या. खरातच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हाही चाकणकर होत्या. तसेच खरातची एक भाची आहे ती चाकणकरांच्या घरात राहते, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारेंनी केला आहे.

रूपाली चाकणकर आणि अशोक खरातची नार्को टेस्ट करा, तसेच त्या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करा. तसेच चाकणकरांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावं, अशा मागण्याही सुषमा अंधारेंनी केल्या आहेत. अंधारेंनी केलेल्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts