Thackeray attacks BJP over empty chairs : सध्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्याचा प्रचार सभा सुरू आहेत. त्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महायुतीच्या काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील मैदानावर झालेल्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना डिवचले आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधील वाद समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – जिल्हा परिषद, पंचायत समिती निडणूुकीची सर्व माहिती एका क्लिकवर
आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी दिल्या. यावेळी सांताक्रुज येथील शाखेला दिलेल्या भेटीवेळी त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेले आरोप प्रत्यारोप आजही चांगलेत चर्चेत आले आहेत. अशातच सोशल मिडीयावरती व्हायरल होत असलेल्या भाजपच्या एका सभेतील मुख्यमंत्र्याच्या भाषणावेळीचा व्हिडीओ ज्यामध्ये सभेतील अनेक खुर्च्छा रिकाम्या होत्या, अनेक जण तिथून बाहेर पडत होते, त्या व्हायरल व्हिडीओवरती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.
पैसे वाटायला कोण आले तर कानाखाली वाजवा
भाजपच्या सभेतील मोकळ्या खुर्त्यांच्या व्हायरल व्हिडीओवरती बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. खुर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद होता. हे सगळे बकवास लोकं आहेत. या ठिकाणी हिंदू मुस्लिम गुजराती आहेत. आपण कुठेही भेदभाव न करता सोयी सुविधा दिल्या आहेत. कोस्टल रोड आपण बनवला. कोव्हिडसारखं काम मुंबई आणि राज्याने केले तसे एकाने ही केलं नाही. गंगेत प्रेतं वाहात होती. आज प्रचार संपल्यानंतर जागे राहा. पैसे वाटायला कोण आले तर कानाखाली वाजवा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तुम्ही सर्वजण कट्टर कडवट निष्ठावान शिवसैनिक
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, इथून आपला विजय निश्चित आहे. तुम्ही सर्वजण कट्टर कडवट निष्ठावान शिवसैनिक आहात. लढाई कशासाठी आहे हे तुम्हाला माहिती आहे. शिवतीर्थावरील सभेत आम्ही दोघेही पोटतिडकीनं बोललो आहोत. आयुष्य गिळायला चालले आहेत. पैसा वाटपाच्या तक्रारी आपण करतोय. तुम्ही सर्व जण कसे राहाता हे पाहायला आलोय. गटारी तुंबली आहे, अनेक समस्या आहेत. ४ वर्षात फक्त तिजोरी लुटून नेली आहे. कामासाठी वापरला असता पैसा तर मुंबई चकाचक झाली असती, यांची वेळी आता शेवटची आहे, असंही पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.












