Navnindra Behl Death | संपूर्ण बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नवनींद्र बहल (Navnindra Behl) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवनींद्र बहल यांच्या निधनानं बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं असून संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच नवनींद्र बहल यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
नवनींद्र बहल यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का
नवनींद्र बहल यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा आणि निर्माता कानू बहल यांनी दिली आहे. कानू बहल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी शोक देखील व्यक्त केला.
कानू बहल यांनी शेअर केली भानविक पोस्ट
“माझं प्रेम, हृदय, विश्वास, गुरू…आई तुझा प्रवास सुखरूप होवो. जोपर्यंत मला तू जन्म देत नाहीस तोपर्यंत माझे डोळे तुझं गोड हास्य आणि तुझ्या जिज्ञासू नजरेचा शोध घेत राहतील. आई तू अशीच चमकत राहा “, असं कानू बहल यांनी भावूक होत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. कानू बहल यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच नवनींद्र बहल यांच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
View this post on Instagram
नवनींद्र बहल या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘द गुरू’, ‘ओये लकी, लकी ओये’, ‘क्वीन’, ‘माचिस’, ‘द प्राइड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमधूनही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे. त्यांनी ‘इश्कबाज’ या गाजलेल्या मालिकेत काम केलं होतं तसेच ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘विजी’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्या त्यांनी काम केलं आहे.
नवनींद्र बहल यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, त्यांनी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक ललित बहल यांच्यासोबत लग्न केलं होतं. तर ललित बहल यांचं कोविडदरम्यान दिल्लीमध्ये निधन झालं होतं. तर आता नवनींद्र बहल यांचं निधन झाल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.












