Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Video
  • डॅा. मुंडेच्या आत्महत्या प्रकरणी फलटणमध्ये आंदोलन… ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध
Video

डॅा. मुंडेच्या आत्महत्या प्रकरणी फलटणमध्ये आंदोलन… ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध

Dr Munde suicide case protest : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज सकाळी फलटणमध्ये दाखल झाल्या आहेत. फलटण परिसरातील शिवसैनिकांनी आज फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहे.  या  प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तपास प्रक्रियेत झालेल्या निष्काळजीपणा आणि राजकीय हस्तक्षेपाचा त्यांनी आरोप करत पीडित डॉक्टरला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून अंधारे यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेची जोरदार चर्चा रंगली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts