बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली. आमच्याकडे सगळे एबी फॉर्म मागत होते. तुझ्या काकाचा आहे का असे अजित पवार यांनी म्हंटले होते. यावर आता भाजपा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. पक्ष माझ्या काकाचा नाही. पक्ष तुमच्याच काकाचा आहे तो व्यवस्थित चालवा. अशा शब्दात भाजपचे नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. क्षीरसागर म्हणाले की, बीडमध्ये खालची टोळी जमा झाली त्यांनी काहीतरी मिस फीड दादांना केले. मी अजित पवारांना स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला होता.










