Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • युद्धाचा फटका एअर इंडियाला; ७० टक्के विमानांची उड्डाणे रद्द
वर्ल्ड

युद्धाचा फटका एअर इंडियाला; ७० टक्के विमानांची उड्डाणे रद्द

air india

Air-india: इराण-इस्राईल आणि अमेरिका युद्धाचा (Iran-Israel and US War) अनेक देशांना फटका बसला असतानाच त्याचा मोठा परिणाम एअर इंडियावरही (air-india) झाला आहे. युद्ध कालावधीत ७० टक्के विमाने रद्द करण्याची वेळ एअर इंडियावर आली आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या महसुलात (Significant Decline in Revenue) मोठी घट झालीय. एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.

हे ही वाचा: खुशखबर..! जर्मनीत भारतीयांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

विमान वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, अनेक विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर जाणवू लागला आहे. तर विमान इंधनाचे दरही दुपटीने वाढल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. युद्धामुळे हवाई क्षेत्र आणि विमानतळ बंद आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडियाला आपली ७० टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली आहेत, अशी माहिती कॅम्पबेल विल्सन यांनी पत्रकात दिली आहे.

विमानांच्या इंधनाचे दर दुपटीहून अधिक

विमानांच्या इंधनाचे (Jet Fuel) दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका पुढील महिन्यापासून बसण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी विमान कंपन्या सरसावल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यानी नवीन तिकिटांवर ‘फ्युएल सरचार्ज’ (इंधन अधिभार) लागू केला आहे.

विमाने लांबून वळवली

ब्रिटन, युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी विमाने आधीच लांबच्या मार्गाने जात होती, आता त्यात आणखी बदल करून ती अधिक लांबून वळवण्यात आली आहेत. यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही जास्त लागत आहे. त्यामुळे तिकीट दर वाढवल्यास विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागणार नाही.

भाडे किती वाढवू शकतो याला मर्यादा

आर्थिक अनिश्चिततेमुळे प्रवाशांच्या मागणीवरही परिणाम होत आहे. प्रत्येक ग्राहक वाढीव भाडे देण्यास तयार नसतो. त्यामुळे मागणी घटण्यापूर्वी आम्ही भाडे किती वाढवू शकतो याला एक मर्यादा आहे, असेही विल्सन यांनी स्पष्ट केले आहे.

अतिरिक्त उड्डाणे तैनात

दरम्यान, काही जागतिक एअरलाईन्स आपली क्षमता कमी करत असताना, एअर इंडियाने युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये नवीन मागणी पाहून अतिरिक्त उड्डाणे तैनात केली आहेत.

परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून

सध्याची परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. जे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभावित क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्या आव्हानांची कंपनीला जाणीव आहे. “आमची टीम परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार बदल करत आहे. सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता राहील,” असेही विल्सन यांनी स्पष्ट केले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts