Brazil police operation Rio de Janeiro deaths : ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरो इथं पोलिसांच्या कारवाईत किमान 64 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंगळवारी रिओ दि जानेरोमध्ये सुमारे 2500 पोलीस आणि सैनिकांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध छापा टाकला. या छाप्यादरम्यान 81 संशयितांना अटक करण्यात आली.
पोलीस आणि ड्रग्ज तस्करांमध्ये गोळीबार :
पोलिसांच्या मते, छाप्यादरम्यान पोलीस आणि ड्रग्ज तस्करांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 64 जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार पोलिसांचा समावेश आहे. सरकारचं म्हणणं आहे की ही कारवाई एक वर्षाहून अधिक काळापासून नियोजित होती आणि त्यात 2500 हून अधिक सुरक्षा कर्मचारी सहभागी होते.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :
पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही कारवाई सुरु असताना मृतांचा आकडा वाढू शकतो. सीएनएनच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान किमान 42 रायफल देखील जप्त केल्या. पोलिसांच्या मते, सुरक्षा दलांनी कारवाईदरम्यान अनेक टोळी-नियंत्रित क्षेत्रांना वेढा घातला आणि प्रवेश करताच गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात 64 जणांचा मृत्यू झाला.
At least 64 killed, including 4 police officers in massive Rio de Janeiro police raid
Read @ANI Story | https://t.co/QltKiiHg9F #Brazil #RiodeJaneiro #PoliceRaid pic.twitter.com/N6sJwRQCqw
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2025
पोलिसांवर ड्रोन हल्ला, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता :
या घटनेबाबत सरकारनं म्हटलं आहे की टोळीतील सदस्यांनी बदला घेण्यासाठी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा आरोप आहे. निवेदनात म्हटलं आहे की, “पेन्हा कॉम्प्लेक्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी गुन्हेगारांनी ड्रोनचा वापर केला.” दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयानं रिओ डी जानेरोमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांच्या छाप्याचं वर्णन भयानक केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयानं म्हटलं आहे की, “रिओ डी जानेरो पोलिसांच्या कारवाईमुळं आम्हाला धक्का बसला आहे, ज्यामुळं 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.”
रिओ डी जानेरोचे राज्यपाल काय म्हणाले? (Brazil police operation Rio de Janeiro deaths)
रिओ डी जानेरोचे राज्यपाल क्लॉडिओ कॅस्ट्रो म्हणाले, “आम्हाला एका भयानक आव्हानाचा सामना करावा लागत आहे. हा सामान्य गुन्हा नाही; डाव्या विचारसरणीच्या कैद्यांच्या गटापासून सुरु झालेला हा गुन्हा आता ड्रग्ज तस्करी आणि खंडणीत गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीत विकसित झाला आहे. ही टोळी वारंवार प्रतिस्पर्धी गट आणि सुरक्षा दलांशी संघर्ष करते.”











