iran-israiel-america war: युद्धाच्या झळा अनेक देशांना बसू लागल्या आहेत. त्यात अनेक भारतीय लोकांचाही (indian) समावेश आहे. त्यामुळे तेथे संकटात असलेल्या लोकांना जम्मू-काश्मीरच्या बडगामधल्या (Jammu and Kashmir Budgam) लोकांनी दागिने आणि पैसे दान करून (Donation of Jewelry and Money) त्यांना मदतीचा हात दिला आहे.
हे ही वाचा: Maharashtra Education: मोठा निर्णय! नववी-दहावीचे वर्ग बंद होण्याची शक्यता; काय आहेत नवे नियम?
सद्य स्थितीत इराणला मदत हवी
पश्चिम आशियात युद्ध सुरु आहे. परिणामी लोक त्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर आलेले संकट मोठे आहे, हे लक्षात घेऊन जम्मू-काश्मीरच्या बडगाममधले लोक इराणच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बडगाममध्ये लोक एका ठिकाणी एकत्र जमले. त्यांनी दागिने आणि पैसे दान केले. संकटात अडकलेल्या लोकांना मदत व्हावी यासाठी तिथल्या लोकांनी हा निर्णय घेतला.
इमाम ज़मानमध्ये पैसा जमा करणार
“आम्ही मशिदीत इमाम ज़मानमध्ये पैसा जमा करण्याच्या एका चांगल्या इराद्याने स्टॉल लावला आहे. आमच्या माता-बहिणी त्यांचे दागिने, पैसे, तांबा दान करत आहेत. सद्य स्थितीत इराणला मदत करण्यासाठी आम्ही हे सर्व करतोय,” असं बडगाममधील मोहसीन अली बोलले.
बडगामच्या आमदाराकडून एका महिन्याचा पगार
बडगाममधील आमदार मुंतज़िर मेहदी यांनी सुद्धा इराणच्या लोकांसोबत उभं राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ‘मी माझा एक महिन्याचा पगार दान करणार आहे. कठीण काळात माणूसकी सर्वप्रथम येते’ असं मुंतज़िर मेहदी म्हणाले.
लोक आपापल्या पद्धतीने करताहेत मदत
जम्मू-काश्मीरमधील या उपक्रमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या संघर्षाचा दूर-दूर पर्यंत परिणाम होत असल्याचं यातून दिसतं. वेगवेगळ्या ठिकाणी लोक आपल्या पद्धतीने मदत करतायत. सोबतच शांततेच सुद्धा आवाहन करण्यात येतय.
एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे विमानाला लक्ष्य
अमेरिकेला युद्धात काल एक धक्का बसला. इराणने हॉर्मुज बेटाजवळ अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा केला. इराणची सरकारी न्यूज एजन्सी Fars News Agency ने हा दावा करताना एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे या विमानाला लक्ष्य केल्याचं दिसत आहे.
‘ट्रू प्रॉमिस 4’ मोहिमेचा भाग
ही कारवाई ‘ट्रू प्रॉमिस 4’ मोहिमेचा भाग असल्याचं इराणकडून सांगण्यात आलय. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस अजून भीषण बनत चाललं आहे. काल इराणने इस्रायलच्या अणू प्रकल्पावर हल्ला केला. या मिसाइल हल्ल्यात इस्रायलमधील अनेक नागरिक जखमी झाले.












