Iran US Diplomatic Push : जागतिक ऊर्जा बाजारात पुन्हा एकदा मोठं स्थित्यंतर दिसून आले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले आहे. मागील सत्रात तेलाच्या किमतीत जवळपास 8 टक्के घट झाली होती. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्याच्या संभाव्य प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाली आहे.
हेही वाचा : पवारचा कोठडीतच संशयास्पद मृत्यू, नेवाळी नाका कांडाला धक्कादायक वळण
तणाव कमी होण्याची शक्यता :
वृत्तानुसार, अमेरिकेने इराणसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवला आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करणे आणि होर्मुझची सामुद्रधुनी हळूहळू खुली करणे यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव ‘एक-पानाच्या निवेदना’च्या स्वरुपात सादर करण्यात आला आहे. इराण येत्या काही दिवसांत यावर प्रतिक्रिया देईल अशी अपेक्षा आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण झाली आहे की, मध्य-पूर्वेतील सध्याचा तणाव कमी होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होईल.
होर्मुझची सामुद्रधुनी मोठा मुद्दा :
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एक महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे, जो काही काळापासून जवळजवळ बंद आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळं हा मार्ग बंद झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा मार्ग पुन्हा सुरू झाला, तर जागतिक तेल पुरवठ्यात मोठी सुधारणा होऊ शकते आणि किमती आणखी खाली येऊ शकतात.
बाजार अजूनही अनिश्चित :
मात्र, काही तज्ञांच्या मते सध्याची घसरण ही एक घाईची प्रतिक्रिया असू शकते. विश्लेषक वंदना हरी यांच्या मते, जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होत नाही, तोपर्यंत बाजारात स्थिरता येण्याची अपेक्षा करणे कठीण आहे.
अमेरिकेची रणनीती आणि जागतिक दबाव :
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी संकेत दिले आहेत की, जर इराण सहमत झाला तर लष्करी कारवाई आणि नाकेबंदी उठवली जाऊ शकते. मात्र, जर करार झाला नाही, तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळं महागाई वाढत असल्यानं अमेरिका देशांतर्गत दबावाखाली आहे.









