Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले

Eknath Shinde Helicopter Incident

Eknath Shinde Helicopter Incident : `महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कल्याण येथील मुरबाड येथे एका लग्न समारंभासाठी जात असताना प्रवासादरम्यान अचानक हवामान खराब झाल्याने वादळी पावसात एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर अडकले. या घटनेने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून उड्डाण केले होते आणि ते कल्याणजवळील मुरबाड येथे एका लग्न समारंभासाठी जात होते. याचदरम्यान खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर वादळी पावसात अडकले असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमान अपघातासंदर्भात सध्या अनेक घटना झाल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी काही महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याना विमान अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागले. अश्यातच अजून एकदा राज्याचा आणखी एका उपमुख्यमंत्र्यांसोबत विमानासंदर्भातील आणखी एक घटना घडल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळाली.

खराब दृश्यमानता, जोरदार वाऱ्याचे झोत आणि अस्थिर हवामानामुळे हेलिकॉप्टर अडकले. परंतु सुदैवाने पायलटने खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टर मुंबईकडे वळवले. त्यानंतर हेलिकॉप्टरने जुहू विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची यानंतर देण्यात आली. त्यामुळे सुदैवाने एक मोठे अघटित टाळल्याचे आपल्याला दिसते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts