• Home
  • ताज्या बातम्या
  • भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान पायलटकडून चूक; नेमकं काय घडलं?
Pune

भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान पायलटकडून चूक; नेमकं काय घडलं?

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal Helicopter: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर लँडिंग करताना मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. नियोजित हेलिपॅडऐवजी हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये उतरवल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर लँडिंगमध्ये मोठी चूक झाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा: “महिला सचिव नको” म्हणत मंत्र्याने डावलल्याचा अनुभव; मनीषा म्हैसकर यांनी केला मोठा खुलासा

खानवडी परिसरात आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या भुजबळ यांचे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी पायलटने चुकून कार पार्किंगच्या जागेतच लँड केले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेदरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी ठरवलेल्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी उतरणे ही मोठी त्रुटी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, Chhagan Bhujbal हे खानवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. या घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts