• Home
  • Top News
  • DJ बंदीच्या मागणीने पुण्यात नवा वाद; ऑपरेटर संघटना चिंतेत
Ganeshotsav 2026

DJ बंदीच्या मागणीने पुण्यात नवा वाद; ऑपरेटर संघटना चिंतेत

Pune Ganeshotsav DJ Ban
75

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्याच्या गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना DJच्या आवाजावरून नवा वाद निर्माण झाला आहे…गणेशोत्सवात DJवर बंदी घालावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी केली आहे…पेठ भागातील नागरिकांना DJच्या मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो, असा दावा बापट यांनी केलाय…मात्र, दुसरीकडे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना साऊंड सिस्टीम हवी असताना DJ ऑपरेटर संघटनेने या मागणीला विरोध करत उपासमारीची वेळ येण्याची चिंता व्यक्त केली आहे पाहूयात…

पुण्याच्या गणेशोत्सवात DJवर बंदीची मागणी का? ( Pune Ganeshotsav DJ Ban )

पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, गणेश मंडळांची मिरवणूक आणि उत्साहाचं वातावरण…मात्र याच गणेशोत्सवातील DJच्या आवाजावरून आता मतमतांतरं समोर येत आहेत…गणेशोत्सवात DJवर बंदी घालावी, अशी मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे…

पेठ भागात मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास…बदलती संस्कृती…ढोल-ताशांनाही विरोध…ही आपली प्रथा किंवा परंपरा नाही, अशी भूमिका…विशेष म्हणजे बापट यांनी केवळ DJच नाही, तर ढोल-ताशांच्या वाढत्या आवाजावरही आक्षेप घेतला आहे…गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृतीच्या नावाखाली वाढत चाललेला मोठा आवाज हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी त्रासदायक ठरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे…

हेही वाचा : पाहा 2026 मधील टॉप 5 प्रसिद्ध गणपतींचं भव्य आगमन

DJ ऑपरेटर संघटनेला रोजगाराची चिंता ( DJ Sound System Pune )

मात्र, या मागणीमुळे DJ ऑपरेटर आणि साऊंड सिस्टीम व्यावसायिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात DJ आणि साऊंड सिस्टीमचा व्यवसाय चालतो…याच काळातील उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो…DJवर पूर्णपणे बंदी आल्यास उपासमारीची वेळ येईल, अशी चिंता DJ ऑपरेटर संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. गणेश मंडळांना साऊंड सिस्टीमची गरज…DJ व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह…बंदीऐवजी नियम आणि वेळेच्या मर्यादेत व्यवसाय करण्याची भूमिका…त्यामुळे एकीकडे नागरिकांच्या आरोग्याचा आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा…तर दुसरीकडे गणेशोत्सवाशी जोडलेला DJ आणि साऊंड सिस्टीमचा व्यवसाय…गणेशोत्सवात DJचा आवाज किती असावा? बंदी हवी की नियमांच्या चौकटीत परवानगी? आणि पारंपरिक गणेशोत्सवाची संस्कृती नेमकी कोणती? या प्रश्नांवर आता पुण्यात चर्चा रंगू लागली आहे…

गणेशोत्सवातील DJचा आवाज हा दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो… मात्र यंदा DJ बंदीच्या मागणीमुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे… नागरिकांचा त्रास आणि DJ ऑपरेटरचा रोजगार, या दोन्हींचा समतोल साधण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts