Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; 410 संस्थांचा पेच कायम
महाराष्ट्र

गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; 410 संस्थांचा पेच कायम

Gokul Milk Union Election
3
Gokul Milk Union Election: गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सत्तासंघर्षाला आता वेग येणार आहे. येत्या ४ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर १० ते ११ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. अंतिम मतदार यादीची तारीख निश्चित झाली असून, निवडणुकीच्या पुढील टप्प्यांनाही लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू झाल्याचं चित्र आहे.

अंतिम मतदार यादी

गोकुळच्या निवडणुकीसाठी ४ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारण १० ते ११ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

निवडणूक कार्यक्रमाला वेग येत असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती आणि निवडणूक कार्यालय निश्चित करण्याच्या हालचालींनाही सोमवारपासून वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: धाराशिवमध्ये शिंदेसेनेची ‘सिक्सर’! 6 नगरसेवकांचा पक्षप्रवेश; ठाकरेंच्या गटाला धक्का

410 संस्थांच्या हरकतींवर सुनावणी

दरम्यान, गोकुळच्या मतदार यादीवरून वादाची शक्यता कायम आहे. 410 संस्थांबाबत दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर आज सुनावणी झाली. या संस्थांना अंतिम मतदार यादीत स्थान देऊ नये, तसेच त्यांनी नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या संस्थांबाबत सरकार न्यायालयातही सुनावणी सुरू असल्याने, न्यायालयाचा निर्णय होईपर्यं त्यांच्याबाबत अंतिम निर्णय घेऊ नये, अशी बाजू सुनावणीदरम्यान मांडण्यात आली. प्रभारी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) नारायण परजाने यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक प्रशासनाची लगबग

गोकुळची निवडणूक 60 दिवसांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर माघारीसाठीचा कालावधी कमी ठेवण्याची शक्यता आहे. पुढील सोमवारपासून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल उपजिल्हाधिकारी यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

ताराबाई पार्कमध्ये निवडणूक कार्यालय?

गोकुळच्या निवडणुकीसाठी ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या इमारतीत निवडणूक कार्यालय सुरू करण्याची शक्यता आहे. अधिकारी नियुक्तीपासून कार्यालय निश्चित करण्यापर्यंतची प्रक्रिया आता वेग घेणार असल्याने लवकरच निवडणूक कार्यक्रमाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ( LS Marathi News Channel )

मतदार यादीवरून पुन्हा वादाची शक्यता

एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना दुसरीकडे 410 संस्थांच्या समावेशावरून निर्माण झालेला वाद महत्त्वाचा ठरणार आहे. अंतिम मतदार यादीत कोणत्या संस्थांचा समावेश होतो, याकडे आता गोकुळच्या राजकारणातील सर्वच गटांचं लक्ष लागलं आहे. 4 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर गोकुळच्या निवडणुकीचं राजकीय चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts