Operation Sagar Bandhu : ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत (srilanka) चौथा पूल बांधून भारतीय सैन्याने शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.त्यामुळे भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय सैन्याने Chilaw येथे, Colombo पासून सुमारे 70 किमी उत्तरेस, 240 फूट लांबीचा एक्स्ट्रा वाइड रिइन्फोर्स्ड हायब्रिड बेली पूल (Extra-Wide, Reinforced Hybrid Belly Pool) यशस्वीरित्या बांधून सुरू केला आहे. हा प्रकल्प ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारतीय सैन्याने बांधलेल्या चौथ्या पुलाचा टप्पा आहे.
हे ही वाचा: होर्मुज सामुद्रधुनीतून तेलपुरवठ्यावर प्रधानमंत्री मोदींचा बॅकअप प्लॅन काय?
मालवाहतुकीच्या हालचालीला चालना
नवीन पूलामुळे कोलंबो-Puttalam दरम्यानची महत्त्वाची वाहतूक जोडणी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे त्या प्रदेशातील एक प्रमुख मार्ग आहे. या पुलामुले लोकांची वर्दळ सुरु होणार आहे. तर मालवाहतुकीच्या हालचालीला चालना मिळणार आहे.
मॉड्युलर रचना आणि जलद उभारणी
बेली पूल हे त्यांच्या मॉड्युलर रचना आणि जलद उभारणी क्षमतेसाठी ओळखले जातात. इतिहासात अशा पुलांचा वापर जगभरातील सैन्य दलांनी आपत्कालीन आणि तात्पुरत्या संपर्कासाठी केला आहे. भारतीय सैन्याला भारतात तसेच मैत्रीपूर्ण देशांमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये (HADR) अशा पुलांची उभारणी करण्याचा मोठा अनुभव आहे.
ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत बांधलेला चौथा पूल
याबाबत अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालयाने म्हटले आहे, “भारतीय सैन्याच्या इंजिनिअर टास्क फोर्सने चिलॉ येथे 240 फूट लांबीचा एक्स्ट्रा वाइड रिइन्फोर्स्ड हायब्रिड बेली पूल यशस्वीरित्या उभारला आहे. हा ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेत बांधलेला चौथा पूल आहे. हा पूल कोलंबो–पुत्तलम मार्गावरील महत्त्वाची जोडणी आहे. ज्यामुळे प्रादेशिक गतिशीलता आणि स्थैर्य वाढते. हा उपक्रम भारताची श्रीलंकेप्रती वचनबद्धता आणि ‘Neighbourhood First’ धोरणाचे प्रतीक आहे.
हायब्रिड बेली पूल जड वाहतुकीसाठी सक्षम
अधिकाऱ्यांनी सांगितले की हा एक्स्ट्रा वाइड रिइन्फोर्स्ड हायब्रिड बेली पूल जड वाहतुकीसाठी सक्षम असून, विशेषतः पायाभूत सुविधांवर ताण येणाऱ्या भागांमध्ये दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
पायाभूत सुविधा मजबूत करणार
Operation Sagar Bandhu ही मोहीम भारताने श्रीलंकेतील महत्त्वाच्या संपर्क सुविधा आणि आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मानवतावादी आणि पायाभूत सहाय्य उपक्रम म्हणून सुरू केली होती. ही मोहीम गेल्या वर्षी Tropical Cyclone Ditwah मुळे झालेल्या विध्वंसानंतर सुरू करण्यात आली.












