Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पाकिस्तानमध्ये ग्लू कारखान्यात बॉयलर स्फोट; किमान 15 जणांचा मृत्यू
Top News

पाकिस्तानमध्ये ग्लू कारखान्यात बॉयलर स्फोट; किमान 15 जणांचा मृत्यू

Smoke and destruction after a boiler explosion at a glue factory in Pakistan that killed at least 15 people

लाहोर : शुक्रवारी पूर्व पाकिस्तानमधील एका ग्लू कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला, ज्यामध्ये किमान 15 कामगार ठार झाले आणि सात जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितलं की त्यांनी कारखाना व्यवस्थापकाला अटक केली आहे आणि स्फोटानंतर लगेच पळून गेलेल्या कारखाना मालकाचा शोध घेत आहेत. ही माहिती वृत्तसंस्था एपीनं दिली आहे.

हे ही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; G-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित

पंजाब प्रांतातील फैसलाबादमधील घटना :

पंजाब प्रांतातील फैसलाबाद येथील औद्योगिक कारखान्यात झालेल्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप निश्चित झालेलं नाही. स्थानिक प्रशासक राजा जहांगीर म्हणाले की स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळं कारखान्याच्या इमारतीचं आणि जवळच्या घरांचं मोठं नुकसान झालं आणि कारखान्याला आग लागली. या मोठ्या घटनेमुळं परिसरात घबराट पसरली आहे. स्थानिक पोलिस अधिकारी मोहम्मद अस्लम यांच्या मते, चौकशी सुरु आहे.

 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला :

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी शोक व्यक्त केला आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. अहवालांनुसार, पाकिस्तानमध्ये औद्योगिक अपघात आणि कारखान्यात आग लागण्याचं एक सामान्य कारण म्हणजे खराब सुरक्षा मानके. 2024 मध्ये, फैसलाबादमधील एका कापड गिरणीत अशाच प्रकारच्या बॉयलर स्फोटात डझनभर कामगार जखमी झाले होते. गेल्या आठवड्यात, पाकिस्तानच्या बंदर शहर कराचीमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला.

 

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts