Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे, चला तर जाणून घेऊयात.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्द्वानीतील रामलीला मैदानातील कथित “शुद्धीकरण” गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी अमित कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आपण वाल्मीकि समाजातील असून राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे अनुसूचित जातीच्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर हल्द्वानी कोतवाली पोलिसांनी FIR नोंदवली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Rahul Gandhi Haldwani case)
SC/ST कायद्यान्वयेही कारवाई
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम 196 आणि 299 तसेच (Rahul Gandhi SC ST Act) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित तरतुदींचा समावेश केला आहे. या कलमांनुसार विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करणे किंवा धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित आरोपांची चौकशी होऊ शकते.
नेमकं प्रकरण काय?
हल्द्वानीच्या (Rahul Gandhi Haldwani case) रामलीला मैदानावर ८ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली होती. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्याच ठिकाणी स्वच्छता आणि धार्मिक विधी करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेला काँग्रेसने जातीय भेदभावाशी जोडत आक्षेप घेतला होता.
राहुल गांधी (Rahul Gandhi FIR) यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत कथित ‘शुद्धीकरण’ विधीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी या प्रकाराला दलितविरोधी मानसिकतेशी जोडत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. याच वक्तव्यावर आक्षेप घेत अमित कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. Rahul Gandhi latest news
या प्रकरणामुळे काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. काँग्रेसकडून या घटनेवर टीका करण्यात आली, तर दुसरीकडे तक्रारदाराच्या आरोपांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आता तपासातून या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



