Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विनातिकीट प्रवास महागात पडणार; जाणून घ्या किती दंड बसू शकतो आणि काय आहेत रेल्वेचे नवीन नियम
Top News

विनातिकीट प्रवास महागात पडणार; जाणून घ्या किती दंड बसू शकतो आणि काय आहेत रेल्वेचे नवीन नियम

विनातिकीट प्रवास Indian Railways Fine Rules 2026
Indian Railways Fine Rules 2026: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आता अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. आजपासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. जाणून घ्या, नवीन नियम काय आहेत आणि किती दंड भरावा लागू शकतो

रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर भूमिका घेत नवीन नियम लागू केले आहेत. २० जून २०२६ पासून विनातिकीट प्रवासासाठी आकारला जाणार किमान दंड दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना यापुढे अधिक आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा: २० वर्षांनी निकाल; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं काय होत?

कायदा २०२६ अंतर्गत

केंद्र सरकारच्या जन विश्वास कायदा २०२६ अंतर्गत रेल्वे कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १३७ आणि १३८ मध्ये बदल करून विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने १९ जून रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून नवीन नियम २० जूनपासून अंमलात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात  प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात जवळपास ४.९६ लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून सुमारे ४०.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत.

तिकीट नसल्यास काय होईल?

नवीन नियमांनुसार खालील प्रकार गंभीर उल्लंघन मानले जाणार आहेत:

वैध तिकीट किंवा पासशिवाय रेल्वे प्रवास करणे

आधी वापरलेले तिकीट पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करणे

फसवणुकीच्या उद्देशाने प्रवास करणे

अशा प्रकरणांमध्ये संबंधित प्रवाशाकडून पूर्ण प्रवासभाडे वसूल केले जाईल. याशिवाय त्याच रकमेइतका अतिरिक्त दंड आकारला जाईल. मात्र हा दंड कोणत्याही परिस्थितीत ५०० रुपयांपेक्षा कमी असणार नाही.

तसेच, प्रवाशाने नेमक्या कोणत्या स्थानकापासून प्रवास सुरू केला याचा पुरावा उपलब्ध नसल्यास, त्या रेल्वेगाडीच्या प्रारंभ स्थानकापासूनचे भाडे आकारले जाईल. त्यामुळेविनातिकीट प्रवास करणाऱ्यांना यापुढे अधिक मोठी रक्कम भरावी लागू शकते.

Website : https://lokshevay.com/

Youtube : youtube.com/channel/UC5tZ7UVY_IuOv88_eQSVMdg

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts