Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • शेतातील मोटार बंद करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
ताज्या बातम्या

शेतातील मोटार बंद करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Baramati farmer electric shock death

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत निलेश सोपान अडागळे (३४) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतातील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या निलेश यांना अचानक शॉक बसला. तात्काळ मदत करण्यात आली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. निलेश यांच्या आकस्मिक निधनाने कोऱ्हाळे बुद्रुक व बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts