Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजारांची वेतनमर्यादा लागू; EDLI विम्याबाबत नवी काय अपडेट?
बिजनेस

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजारांची वेतनमर्यादा लागू; EDLI विम्याबाबत नवी काय अपडेट?

EPFO Latest Update 2026
0
EPFO Latest Update 2026: नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीशी संबंधित महत्वाचा बदल समोर आला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) अनिवार्य कव्हरेजसाठी असलेली मासिक वेतनमर्यादा आता १५ हजारवरून २५ हजार करण्यात (EPFO wage limit 25000 )आली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय १७ सप्टेंबर २०२६ पासून (EPFO employees update) लागू झाला आहे.

या बदलामुळे यापूर्वी EPFO च्या अनिवार्य सदस्यत्वाच्या मर्यादेबाहेर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आता सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

वेतांमर्यादा वाढल्याने काय बदलणार?

आतापर्यंत EPFOच्या अनिवार्य कव्हरेजसाठी १५ हुन मासिक वेतनाची मर्यादा होती. आता ही मर्यादा २५ हुन करण्यात आल्याने या श्रेणीतील पात्र कर्मचाऱ्यांचा EPFशी संबंध (EDLI insurance) येऊ शकतो.

हेही वाचा: बाप्पाची गोष्ट, मुलांची मस्ती! वीकेंडला पाहा बाळ गणेशाचे ‘हे भन्नाट चित्रपट

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 51 लाख अतिरिक्त कर्मचारी EPFOच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.

EPFसोबतच पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांना Employees’ Pension Scheme (EPS) आणि Employees’ Deposit Linked Insurance (EDLI) यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचाही फायदा मिळू शकतो.

EDLI म्हणजे नेमकं काय?

EDLI म्हणजे Employees’ Deposit Linked Insurance Scheme. EPFOच्या सदस्य कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पात्र कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी ही विमा योजना (EPF insurance benefit) आहे.

या योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे विम्याचा प्रीमियम भरावा लागत नाही. योजनेतील नियमांनुसार पात्रता असल्यास कुटुंबीयांना विमा लाभ मिळतो.

सध्या किती आहे EDLI विमा?

उपलब्ध अधिकृत माहितीनुसार EDLI अंतर्गत पात्र सदस्याच्या कुटुंबाला कमाल ₹7 लाखांपर्यंत विमा लाभ मिळू शकतो.

यामुळे सोशल मीडियावर किंवा काही वृत्तांमध्ये चर्चेत असलेली ₹10.5 लाखांची संभाव्य विमा मर्यादा सध्या अधिकृतपणे (Employees Pension Scheme) लागू झाली आहे, असे म्हणता येणार नाही.

7 लाखांची मर्यादा ₹10.5 लाख करण्याबाबत सरकार किंवा EPFOकडून अधिकृत निर्णय किंवा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याची खात्री होईल.

EDLIचा लाभ कधी मिळतो?

EDLIचा लाभ मुख्यतः EPFO सदस्याचा सेवेत (EPFO scheme 2026) असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पात्र वारसदारांना किंवा नामनिर्देशित व्यक्तीला मिळतो. विम्याची रक्कम आणि पात्रता यासाठी योजनेतील संबंधित नियम लागू होतात.

म्हणूनच कर्मचाऱ्यांनी आपल्या EPFO खात्यातील नॉमिनीची माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे.

कर्मचाऱ्यांसाठी नेमका फायदा काय?

वेतनमर्यादा ₹15 हजारांवरून ₹25 हजारांपर्यंत वाढवल्यामुळे EPFOच्या सामाजिक सुरक्षा कव्हरेजचा विस्तार झाला आहे. त्यामुळे नव्या मर्यादेत येणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि संबंधित विमा संरक्षणाच्या व्यवस्थेशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.

थोडक्यात, ₹25 हजारांची वेतनमर्यादा वाढ हा अधिकृत बदल आहे; मात्र EDLI विमा ₹10.5 लाख होण्याची माहिती अद्याप निश्चित अधिकृत निर्णय म्हणून ग्राह्य धरता येत नाही.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts