Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार उद्धघाटन
Pune

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार उद्धघाटन

9 10 12

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष आण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य,माजी नगरसदस्या आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘खेळ पैठणीचा’ आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वा. महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ५ वा. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts