• Home
  • महाराष्ट्र
  • युद्धाच्या विळख्यात अडकले पुण्याचे 84 जण; विद्यार्थी अन् शिक्षकांचा समावेश, भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
Pune

युद्धाच्या विळख्यात अडकले पुण्याचे 84 जण; विद्यार्थी अन् शिक्षकांचा समावेश, भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

dubai

Indira Collage Pune Students And Teachers Stranded In Dubai | सध्या अमेरिका (America) आणि इस्त्रायल (Israel) या दोन देशांचे इराणसोबत (Iran) जोरदार युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्त्रायल इराणवर हवाई हल्ले (Air Strike) करताना दिसत आहे, तर दुसरीकडे इराणनेही दोन्ही देशांवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इराणने दुबईवर (Dubai) क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर केली आहे. तर या युद्धामुळे दुबईतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील 84 जण या युद्धाच्या विळख्यात सापडले आहेत.

हेही वाचा – मोठी दुर्घटना! नागपुरमधील कंपनीत भीषण स्फोट, 15 कामगारांचा मृत्यू

इंदिरा कॉलेजचे 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक दुबईत अडकले

पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) इंदिरा कॉलेजचे (Indira Collage) 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक दुबईत अडकले आहेत. सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्यामुळे 84 भारतीय अडकून पडले आहेत. तर हे सर्वजण सुरक्षित असल्याची मोठी माहिती सरकारनं दिली आहे.

इंदिरा कॉलेजचे डीन जनार्दन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईत अडकलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुखरूप आहेत. ते त्यांच्या पालकांच्या सतत संपर्कात आहेत. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी दुबईतील भारतीय दुतावास आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आमचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती डीन जनार्दन पवार यांनी दिली आहे.

इंदिरा कॉलेजचे विद्यार्थी ‘स्टडी व्हिसिट’साठी दुबईला गेले होते. पण अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हे विद्यार्थी दुबईमध्ये अडकून पडले आहेत. पण, या विद्यार्थ्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून लवकरात लवकरत भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts