Ekta Nagar : पुणे जिल्ह्यासह परिसरात काही दिवसांपासून सतत पाऊस बरसताना दिसत आहे..आता मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे…यामुळे आता खडकवासला धरणातून तब्बल 43 हजार 500 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे…पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे… या प्रचंड विसर्गामुळे मुठा नदीकाठच्या सखल भागांना पाण्याचा मोठा वेढा पडला असून, प्रशासनाने नदीकाठच्या संपूर्ण परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या पुराचा सर्वाधिक फटका शहराच्या मध्यवर्ती आणि नदीलगतच्या एकता नगर भागाला बसला आहे…एकतानगरमध्ये नदीचे पाणी घुसले असून सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आहे..तळमजल्यातील नागरिकांना घर सोडावं लागत आहे…नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहे…पाहूयात की एकतानगरमध्ये अचानक पाणी कसं घुसलंय? यापूर्वी एकतानगरमध्ये कधी पूर आला होता?
हेही वाचा : खडकवासला धरण पूर्ण भरलं! विसर्ग का
पुण्यातील एकतानगर पुन्हा बुडालं! खडकवासला धरणातून 43,500 क्युसेक विसर्ग ( Ekta Nagar )
खडकवासला धरण ( Khadakwasla Dam Water Release ) साखळीतील वरच्या भागात म्हणजेच पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण परिसरात जोरदार पाऊस झाला आहे… यामुळे या धरणांमधील पाण्याची पातळी अवघ्या काही तासांत शतप्रतिशत पूर्ण भरली… धरणांची सुरक्षितता आणि पाणी साठवण्याच्या मर्यादा लक्षात घेता, प्रशासनाला खडकवासला धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे 11 दरवाजे खुले करावे लागले… सर्व दरवाजे उघडल्यामुळे निर्माण झालेला 43,500 क्युसेकचा हा विसर्ग इतका प्रचंड आहे की, धरणातून बाहेर पडणारे पाणी थेट रस्त्यांवर आणि सखल भागांत घुसले आहे.. खडकवासला ते पुणे शहराच्या मुख्य भागाकडे येणाऱ्या काही प्रमुख रस्त्यांना आता नदीचे स्वरूप आले असून, वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे… सखल भागातील रस्त्यांवरून पाण्याचे मोठे लोंढे वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घरातून बाहेर पडणेही अशक्य झाले आहे…
या संपूर्ण पूरस्थितीचा सर्वात मोठा फटका एकता नगर परिसराला बसला आहे.. मुठा नदीचे पाणी अचानक या भागात वेगाने घुसल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे…एकता नगरमधील खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरात कंबरभर ते छातीपर्यंत पाणी साचले आहे… घरात पाणी शिरल्याने लोकांच्या अन्नधान्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि फर्निचर अशा सर्वच संसाराच्या उपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे… अनेक कुटुंबांनी वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धान्य, लहान मुलांची पुस्तके आणि रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पाण्यात आणि चिखलात पूर्णपणे खराब झाल्या आहेत. अनेक नागरिक आपापल्या घरातील उरलेल्या वस्तूसाठी जीव धोक्यात घालून धडपड करताना दिसत आहेत…
एकतानगरमध्ये घरांमध्ये घुसले पाणी, नागरिकांचे मोठे हाल
Ekta Nagar : सतत वाढत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे एकता नगरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.. घरात पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा सुरक्षात्मक उपाय म्हणून खंडित करण्यात आल्याची माहिती आहे..ज्यामुळे अंधारात लोकांना अधिक कसरत करावी लागणार आहे… वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे हाल तर पाहवत नाहीत… पावसाचा जोर आणि पाण्याचा विसर्ग पाहता प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले आहे. पुणे महानगरपालिका, अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तात्काळ एकता नगरमध्ये धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले आहे… खालच्या मजल्यावर राहणाऱ्या आणि पाण्यात अडकलेल्या लोकांना बोटींच्या आणि मानवी साखळीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे….
प्रशासनाकडून नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना वारंवार सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले जात आहे… जे नागरिक पहिल्या मजल्यावर आणि त्याहून वरच्या मजल्यावर राहत आहेत, त्यांना घरातच राहण्याचा आणि गरज नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे… ज्यांचे घर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, जे विस्थापित झाले आहेत, अशा नागरिकांसाठी पुणे महापालिकेने तात्काळ पर्यायी व्यवस्था केली आहे… शहरातील विविध शाळा, समाजमंदिरे आणि सनसिटी परिसरातील बॅडमिंटन हॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी विस्थापित नागरिकांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे… या मदत केंद्रांमध्ये नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा, अन्न, पिण्याचे पाणी आणि अंथरूणाची सोय प्रशासनाकडून आणि विविध सामाजिक संस्थांकडून केली जात आहे…
प्रशासनाकडून बचावकार्य वेगात, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सध्याची पूरस्थिती पाहता खडकवासला धरणातून होणारा विसर्ग हा पुणेकरांसाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तासांत धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे… जर पाऊस असाच सुरू राहिला, तर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागू शकतो, ज्यामुळे शहरातील इतर सखल भागांनाही पुराचा धोका निर्माण होऊ शकतो…सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे…
मात्र ज्या भागात पूर आला आहे, त्याच भागातून पुण्याचे महापौर येतात..पुणे महापालिकेत भाजपला मोठा विजय मिळाला आहे..भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे याच सिंहगड रोड परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत… त्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच प्रभागात ही भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे…तसंच 2024 मध्ये पूर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार एकता नगर आणि सिंहगड रोड परिसरासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आणि पुनर्वसनाचा प्रस्ताव समोर आला होता… महानगरपालिकेने सुमारे ३६९ कोटी रुपयांचा फ्लड मिटिगेशन आणि पुनर्वसनाचा आराखडाही मंजूर केला होता… परंतु, 2024 मध्ये निवडणुका संपल्या आणि राजकीय नेतृत्व बदलले तसे हे कागदपत्रांचे आणि घोषणांचे “बार” पुढे सरकलेच नाहीत…आज राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर पुण्यात भाजपची सत्ता आहे..मात्र या भागातील लोकांना दरवर्षी प्रमाणे यंदाही वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे..सरकार यावर ठोस तोडगा कधी काढणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत..









