Parag Shah : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार पराग शाह यांचा एक थक्क करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तब्बल ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचे मालक असलेले पराग शाह घाटकोपरच्या रस्त्यांवर थेट भिकाऱ्याच्या वेशात फिरताना दिसल्याने सुरुवातीला सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
नेमका प्रकार काय घडला?
सध्या जैन धर्मीयांचा चातुर्मास सुरू असून, पराग शाह यांचे धर्मगुरू नम्रमुनी यांनी त्यांना गरिबी आणि भिकारी असण्याचे वास्तव जवळून अनुभवण्याची सूचना केली होती. गुरूंच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करत पराग शाह यांनी आपली संपूर्ण सुरक्षा यंत्रणा, महागड्या गाड्या आणि सर्व सुखसुविधा बाजूला ठेवल्या. भिकाऱ्याचा वेष परिधान करून त्यांनी घाटकोपरच्या रस्त्यांवर काही तास व्यतीत केले, भीक मागून जेवण केले आणि रस्त्याच्या कडेला बसून हा वेगळा अनुभव घेतला. धक्कादायक म्हणजे वेशभूषेमुळे रस्त्यावरील एकाही नागरिकाला ते आमदार असल्याचे ओळखता आले नाही.
हेही वाचा : जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान
3,383 कोटींचे आमदार पराग शाह भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर ( Parag Shah )
नंतर त्यांनी स्वतःचा मेकअप काढून ज्या-ज्या ठिकाणी ते गेले होते, तिथे पुन्हा जाऊन लोकांशी मनमोकळी चर्चा केली व हा अनुभव धर्मगुरूंसमोर मांडला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार तब्बल ३,३८३ कोटी रुपयांची संपत्ती घोषित करणारे पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रातील बडे उद्योजक आहेत. त्यांच्या या अनपेक्षित आणि जमिनीवर उतरून घेतलेल्या अनुभवाच्या व्हिडिओची सध्या संपूर्ण राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पराग शाह यांच्यासारखे वेशभूषा बदलून देशात व राज्यात फिरून वस्तुस्थितीचा आढावा घ्यावा








