Breaking News :
  • Home
  • Top News
  • जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान
Ganeshotsav 2026

जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान

Bhausaheb Rangari Ganpati
6

अमोल धर्माधिकारी | Pune Westin Beuro Head

Bhausaheb Rangari Ganpati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘श्री गणेश सुवर्णधाम मंदिरा’त विराजमान झाले. जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, मिरवणुकी दरम्यान इंद्रधनुष्यातील सप्तरंगाची उधळण आणि बुधवार चौकात सात थर रचून करण्यात आलेले बाप्पाचे जंगी स्वागत हे विशेष आकर्षण ठरले. या आगमन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान ( Bhausaheb Rangari Ganpati )

दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूचे नगारा वादन झाले. त्यानंतर आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.

रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक आणि बाजीराव रस्त्यावरून ही भव्य मिरवणूक दिमाखात निघाली. मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय शंखनाद यांसारख्या प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांनी आपल्या अप्रतिम वादनाचा नजराणा पेश केला. मिरवणूक बुधवार चौकात पोहोचताच तिथे कसबा, पुणे दहीहंडी संघाच्या गोविंदांनी मानवी मनोरे (थर) रचून बाप्पाला अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात मानवंदना दिली. यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी व भक्तांनी हवेत सप्तरंगांची उधळण केली. ढोलांच्या तालावर नाचणारे तरुण-तरुणी, हवेतील विविधरंगी गुलाल आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने संपूर्ण बुधवार चौक दुमदुमून गेला होता.

हेही वाचा : मयूर रथातून दगडूशेठ बाप्पाचे दिमाखात आगमन; पाहा खास HD फोटो

पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना ( Hariprasad Chaurasia )

दुपारी साडेबाराच्या सुमारास आगमन मिरवणूक श्री गणेश सुवर्णधाम मंदिरासमोर पोहोचल्यानंतर बाप्पांची मूर्ती अत्यंत देखण्या आणि सुशोभित मखरात विराजमान करण्यात आली. प्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव स्वामी गोविंदगिरी महाराज, खासदार सुप्रिया सुळे आदींनी श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात येऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची बाप्पाची आगमन मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली. ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शुभहस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. बाप्पाच्या आगमनाने आम्हाला अतिशय आनंद झाला असून पुढील दहा दिवस हा आनंद असाच कायम राहणार आहे. राज्यावरील सर्व विघ्न दूर कर आणि भरपूर पाऊस पडून सर्वत्र आनंदीआनंद व्हावा, सर्वांना सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभावी, अशी प्रार्थना आम्ही बाप्पाकडं केली.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts