Dagdusheth Ganpati Atharvashirsha 2026 : ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… आणि ओम गं गणपतये नमः … च्या जयघोषाने ॠषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. तब्बल ३५ हजार पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष, अथर्वशीर्ष आणि महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
३५ हजार महिलांच्या अथर्वशीर्ष पठणाने दगडूशेठ गणपती परिसर भक्तिमय ( Dagdusheth Ganpati Atharvashirsha 2026 )
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण गणेशोत्सवातील प्रेम मंदिराच्या प्रतिकृती समोर पार पडले.
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सचिन आखाडे, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पावसाचे वातावरण असले तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४१ वे वर्ष होते.
हेही वाचा : मयूर रथातून दगडूशेठ बाप्पाचे दिमाखात आगमन; पाहा खास HD फोटो









