SIR election second phase : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत देशव्यापी SIR (विशेष सघन पुनरावृत्ती) ची घोषणा केली. बैठकीदरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की, मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) चा दुसरा टप्पा 12 राज्यांमध्ये सुरु होत आहे. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदार जोडणे आणि चुका दुरुस्त करणे यांचा समावेश असेल.
काय म्हणाले मुख्य निवडणुक आयुक्त :
दिल्ली इथं पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “आज आम्ही विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीची घोषणा करण्यासाठी इथं आहोत. मी बिहारच्या मतदारांना शुभेच्छा देतो आणि या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालेल्या आणि ती यशस्वी करणाऱ्या 75 दशलक्ष मतदारांना सलाम करतो.” त्यांनी पुढं सांगितलं की, आयोगानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली.
Phase 2 of SIR (Special Intensive Revision) to be carried out in 12 States/UTs. West Bengal, Tamil Nadu, Uttar Pradesh among these 12 states. pic.twitter.com/LQoQ4K8ONq
— ANI (@ANI) October 27, 2025
आतापर्यंत आठ वेळा करण्यात आलं SIR :
1951 ते 2004 दरम्यान देशात आठ वेळा विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी मतदार याद्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे. तसंच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये या टप्प्यात एसआयआर करण्यात येईल त्या राज्यांमधील मतदार याद्या आज रात्री गोठवल्या जातील.
एसआयआर का आवश्यक आहे? SIR election second phase
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “एसआयआरसारखी प्रक्रिया आवश्यक असण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये वारंवार स्थलांतर, ज्यामुळं अनेक ठिकाणी मतदारांची नोंदणी होते; मृत मतदारांची नावं काढून टाकण्यात अपयश; आणि यादीत परदेशी लोकांचा चुकीचा समावेश यांचा आदी बाबी आहेत.”












