Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • रवींद्र जडेजानची IPL 2026 पूर्वी घरवापसी; संजू सॅमसनसह 10 खेळाडूंनी बदलला संघ
क्रीडा

रवींद्र जडेजानची IPL 2026 पूर्वी घरवापसी; संजू सॅमसनसह 10 खेळाडूंनी बदलला संघ

Ravindra Jadeja IPL 2026 Team Change : पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामात सर्व संघांमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळतील. रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जमधून राजस्थान रॉयल्समध्ये जाण्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे, तर संजू सॅमसनचे सीएसकेमध्ये जाण्याबाबत चर्चा सुरु होती. आता, चित्र अखेर स्पष्ट झालं आहे, आयपीएलनं अधिकृतपणे खेळाडूंच्या ट्रेडद्वारे रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्स संघात समाविष्ट केल्याची घोषणा केली आहे, तर संजू सॅमसन सीएसके संघात सामील झाला आहे.

जडेजाला राजस्थाननं घेतलं 14 कोटींत :

राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा रवींद्र जडेजा 2012 च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाल्यापासून त्यांच्याकडून खेळला आहे. जडेजानं 12 हंगामांपासून सीएसकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रवींद्र जडेजा हा आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक मानला जातो, त्यानं 250 हून अधिक सामने खेळले आहेत. गेल्या हंगामापर्यंत रवींद्र जडेजाचं मानधन 18 कोटी रुपये होतं, परंतु राजस्थान रॉयल्सनं खेळाडूंच्या ट्रेडमधून त्याला 14 कोटी रुपयांना खरेदी केलं.

 

सीएसकेनं संजू सॅमसनसाठी खर्च केले 18 कोटी :

आयपीएलच्या अनेक हंगामात राजस्थान रॉयल्सचा भाग राहिलेला आणि संघाचं नेतृत्व करणारा संजू सॅमसन आता रवींद्र जडेजाच्या राजस्थानमध्ये स्थलांतरानंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आहे. संजूनं 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होते, ज्यात तो 2016 आणि 2017 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. तो मागील सर्व हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं खेळाडूंच्या व्यापार नियमांनुसार संजू सॅमसनला त्यांच्या संघात घेण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च केले आहेत.

हे ही वाचा – कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचं वर्चस्व; बुमराहच्या पाच विकेट

आतापर्यंत ट्रेड झालेले खेळाडू (Ravindra Jadeja IPL 2026 Team Change)

संजू सॅमसन (CSK मध्ये ट्रेड) – 18 कोटी रुपये
रवींद्र जडेजा (RR मध्ये ट्रेड) – 14 कोटी रुपये
सॅम करन (RR मध्ये ट्रेड) – 2.4 कोटी रुपये
मोहम्मद शमी (LSG मध्ये ट्रेड) – 10 कोटी रुपये
मयंक मार्कंडे (MI मध्ये ट्रेड) – 30 लाख रुपये
अर्जुन तेंडुलकर (LSG मध्ये ट्रेड) – 30 लाख रुपये
शरफान रुदरफोर्ड (MI मध्ये ट्रेड) – 2.6 कोटी रुपये
शार्दुल ठाकूर (MI मध्ये ट्रेड) – 2 कोटी रुपये
नितीश राणा (DC मध्ये ट्रेड) – 4.2 कोटी रुपये
डोनोवन फरेरा (RR मध्ये ट्रेड) – 1 कोटी रुपये

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts