नुकतेच बिहार विधानसभा निवडणूकीचे निकाल आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भाजपच्या विजयाचा बोलबाला सुरु आहे. असे असताना दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘होय… मी कट्टर भाजप समर्थक आहे…’ असं वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे विरोधकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांनी डायरेक्ट सराफ यांची लाचारीचं काढली आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
एका कार्यक्रमात निवेदिता सराफ म्हणाल्या, आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन…मी कट्टर बीजेपी समर्थक असल्याने मला खूप आनंद झाला…’ त्यांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केलीय. पुढे बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरुवात बालरंगभूमी पासून झाली. सुधा करमरकर या माझ्या गुरु आहेत. त्यांच्या संस्थेत अनेक बालनाट्य केली. मला स्टेजवर उभं राहायला कोणी शिकवलं तर ते सुधाताई यांनी. त्या काळात रत्नाकर मतकरी, सुधाताई सातत्याने बालनाट्य करत महाराष्ट्रभर दौरे करायचे… माझी वाटचाल बाल रंगभूमी पासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे असं वाटत आहे… असं निवेदिता सराफ म्हणाल्या. पण भाजपद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये वातावरण तापलं आहे.
हेही वाचा – मुंबईत महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार; काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांची अधिकृत घोषणा
महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे, सत्तेसमोर लाचार नाही झालं पाहिजे; वर्षा गायकवाड
त्यांच्या बीजेपी समर्थक असल्याच्या वक्तव्याचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला आहे. खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, सत्तेसमोर काही लोक लाचार असतात. आता आपण बघतोय की खुप कलाकार बोलायला लागलेत की आपण कोणाचे फॅन आहेत. मला काही समजलचं नाही मुंबईत किंवा महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. मुंबई बद्दल बोलायचं झाल तर प्रदुषणाचा त्रास आहे, वाहतूक कोंडीचा त्रास आहे. एरवी नळांना पाणी येत नाही मात्र, पावसाळ्यात रस्ते तुडुंब पाहतात. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. या प्रश्नाची उत्तर विचारली पाहिजेत ना ? आज रेल्वेने जायचं म्हणलं तर रेल्वेचे काय हाल आहेत. मला असं वाटतंय की निवेदित सराफच्या मिस्टरांना मधल्या काळात फार मोठे पुरस्कार मिळाले आहेत. कदाचित त्यांना असं वाटत असेल की, सरकारचं झुकत माप असल्यामुळे हे झालं. मला असं वाटतंय की, महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे, सत्तेसमोर लाचार नाही झालं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
पुरस्कारासाठी गुळ लावण्याचं काम सुरू; किशोरी पेडणेकर
मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील यावर स्वतःमत व्यक्त केलं आहे. ‘निवेदिता सराफ हिचा राजकारणाशी काय संबंध… पुरस्कारासाठी गुळ लावण्याचं काम सुरू असल्याचं त्या म्हणाल्या.
निवेदिता सराफ यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे; प्रवीण दरेकर
निवेदिता सराफ याच्यावर विरोधकांकडून होत असलेली टीका पाहता, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र अभिनेत्रीची पाठराखण केलीय. ‘निवेदिता सराफ यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे. भाजपला समर्थन देऊन कलाकारांच्या मनात काय आहे ते दिसतंय. त्याचं राजकारण कुणी करू नये… असं दरेकर म्हणाले.












