• Home
  • लाईफस्टाईल
  • सावधान ! तुम्हीही हिवाळ्यात कानटोपी घालून झोपतात का ? जाणून घ्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर कि नुकसानदायक
लाईफस्टाईल

सावधान ! तुम्हीही हिवाळ्यात कानटोपी घालून झोपतात का ? जाणून घ्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर कि नुकसानदायक

Person sleeping in winter while wearing ear caps, showing effects on health and comfort

हिवाळा आला कि प्रत्येक व्यक्ती थंडी पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. बरेच जण थंडी सुरु झाल्यावर स्वेटर, टोपी, हातमोजे पाय मोजे खरेदी करण्याची तयारी करतात.आपण देखील रात्री झोपताना ब्लॅंकेट, टोपी, स्वेटर घालून झोपतो. परंतु हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का ? काही जणांना विश्वास आहे कि शरीराला संपूर्ण कव्हर करून झोपणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आणि आरामदायक आहे. परंतु बऱ्याच जणांना वाटतं की हे आयोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घेऊया नेमकं सत्य आहे तरी काय ?

झोपताना आपले शरीर स्वतःला थंड करते. ज्यामुळे शांत आणि आरामदायक झोप लागेल. तर अशावेळी हलकी टोपी घालणे फायदेशीर ठरू शकते परंतु अत्यंत उबदार किंवा जड टोपी घालणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही श्वास घेण्यायोग्य कापडापासून बनवलेली टोपी घालण्यास प्राधान्य देऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, झोपेवेळी टोपी घालून झोपल्यास केस आणि टाळू आपण धूळ आणि बेडींग पासून वाचू शकतो. हे लांब केस असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्ही रात्री झोपताना जास्त उष्णता आणि दबाव आणणारी टोपी घालत असाल तर तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी झोपताना स्लीपिंग कॅप घातल्यास तुम्हाला आरामदायक झोप येऊ शकते.

कानटोपी सोबतच तुम्ही जर पायात मोजे घालून झोपत असाल तर जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ. झोपताना मोजे घालून झोपणे हे बऱ्याच जणांना फायदेशीर वाटू शकते. तुमचे पाय उबदार ठेवण्यासाठी ते फायदेशीर आहे. तसेच मोजे पायात घातल्यामुळे लवकर झोप येते. आणि गाढ झोप देखील लागते. जर तुम्ही हलके आणि आरामदायक मोजे पायात घालत असाल तर रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. ती सुधारते, रात्रभर पाय थंड किंवा सुन्न होण्यापासून रोखते. परंतु जर तुम्ही खूप घट्ट मोजे घालत असाल तर तुमच्या आरोग्यावर भयानक परिणाम होऊ शकतो. कारण घट्ट मोजे घातल्यामुळे रक्ताभिसर प्रक्रियेत अडचण येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts