• Home
  • मनोरंजन
  • The Family Man Season 3 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज; जाणून घ्या ही वेब सिरिज पहावी की नाही ?
मनोरंजन

The Family Man Season 3 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज; जाणून घ्या ही वेब सिरिज पहावी की नाही ?

Manoj Bajpayee in The Family Man Season 3 after OTT release on Prime Video

The Family Man Season 3 OTT Release : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत आणि चर्चित असलेली वेब सिरिज आज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दिग्दर्शक राज निडीमोरू आणि कृष्णा डिके यांच्या द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी असून आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरिज रिलीज करण्यात आली आहे. आणि त्यानंतर लगेचच सीरिज पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

‘द फॅमिली मॅन सीझन ३’ या वेब सिरिजमध्ये मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो की देशाची सेवा करतो आणि एक प्रेमळ पाती आणि वडील म्हणून घराची जबाबदारी पार पाडतो. याशिवाय या नवीन सीझन मध्ये दोन मोठे खलनायक देखील असणार आहे. त्यांचे नाव आहे, जयदीप अहलावत आणि निम्रत कौर. 2019 मध्ये या वेब सिरीजच पहिलं भाग तर 2021 मध्ये दूसरा भाग प्रदर्शित झाला  होता. हे दोन्ही भाग प्रचंड गाजले होते. त्यामुळे तिसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता लागून होती.

हे कलाकार आहेत मुख्य भूमिकेत

या वेब सिरीजचे दिग्दर्शक राज डिके आणि सुमन कुमार यांनी या सिरीजचे लिखाण केले असून सुमित आरोरा यांनी संवाद लेखन केले आहे. याशिवाय या वेब सिरिज मध्ये शरब हाशमी (जेके तलपदे), प्रियामणी (सुचित्रा तिवारी), अश्लेषा ठाकूर (धृती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी), श्रेया धनवंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी) हे देखील मुख्य भूमिकेत दिसत   आहे.

हे ही वाचा : नोव्हेंबरचा शेवटचा तिसरा आठवडा असणार खास; कारण या OTT प्लॅटफॉर्म वर रंगणार भन्नाट वेब सिरीजचा खेळ

काय आहे चित्रपटाची कथा

द फॅमिली मॅन च्या तिसऱ्या सीझन मध्ये श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयीला वॉन्टेड दाखवण्यात आले आहे. श्रीकांतवर मोठी संकटे कसे येतातआणि या अडचणी येण्याचे मुख्य कारण आहे रूक्मा. या अडचणी श्रीकांत वर कशी आणि का येतात याची उत्तरे सिरिज मध्ये मिळतील परंतु या वेब सिरीजची संपूर्ण कथा ताणल्या गेल्याचे निदर्शनास येते. एवढेच नाही तर सर्वात जास्त नैराश्य देणारा भाग म्हणजे श्रीकांत तिवारीच्या कुटुंबाची कहाणी. द फॅमिली मन च्या पहिल्या दोन भागांमध्ये व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा संघर्ष दाखवण्यात आला  होता. परंतु तिसऱ्या भागामध्ये नैराश्य जाणवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts