T20 World Cup 2025 Schedule : मंगळवारी (24 नोव्हेंबर) आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरु होईल आणि 8 मार्चपर्यंत चालेल. हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करतील. आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) चे अध्यक्ष जय शाह, माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं.
पहिल्या दिवशी होणार तीन सामने
या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारी रोजी होणार असून पहिला पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात, दुसरा बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज तर तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकाता/कोलंबो इथं होईल, तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी मुंबईत होईल. अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो इथं होईल. या स्पर्धेत 40 गट सामन्यांसह एकूण 55 सामने असतील.
भारताचे T20 विश्वचषक सामने कधी?
या विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यातील पहिला सामना 15 फेब्रुवारी रोजी होईल. विश्वचषकात खेळणाऱ्या सर्व 20 संघांना चार गटात विभागण्यात आलं आहे, प्रत्येक गटात पाच संघ आहेत. या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जाईल. भारताचा दुसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होईल. 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना होईल. टीम इंडिया 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळेल.
हेही वाचा – स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती स्थिर; पलाशनंही घेतले उपचार
भारतातील 5 शहरांत होणार सामने
खरं तर, पहिल्या उपांत्य फेरीसाठी आणि अंतिम सामन्यासाठी दोन ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत जेणेकरुन जर पाकिस्तान या टप्प्यात पोहोचला तर ते त्यानुसार श्रीलंकेत आपले सामने खेळेल. भारतात होणाऱ्या T20 विश्वचषक 2026 साठी पाच ठिकाणं निवडण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई यांचा समावेश आहे. श्रीलंकेत कोलंबो आणि कॅंडी हे सामने खेळण्यासाठीचे ठिकाणे आहेत. श्रीलंकेत कोलंबोमधील आर. प्रेमदासा आणि सिंहलीज स्पोर्ट्स क्लब तर कॅंडीमधील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम इथं सामने होतील.
The schedule for ICC Men’s @T20WorldCup 2026 is here! 📅
The matches and groups were unveiled at a gala event in Mumbai led by ICC Chairman @JayShah, and with new tournament ambassador @ImRo45 and Indian team captains @surya_14kumar and Harmanpreet Kaur in attendance.
✍️:… pic.twitter.com/fsjESpJPlE
— ICC (@ICC) November 25, 2025
एकूण 40 गट सामने होणार कसं आहे स्वरुप
7 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एकूण 40 गट सामने खेळले जातील, ज्यामध्ये प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सुपर-8 फेरीत प्रवेश करतील. सुपर-8 फेरीच्या शेवटी अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने कोलकाता/कोलंबो आणि मुंबई इथं खेळले जातील, तर अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद/कोलंबो इथं होईल. भारताची जोडी पाकिस्तानसोबत अमेरिकेसह गट अ मध्ये आहे आणि भारत 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. नेदरलँड्स आणि नामिबिया हे गटातील उर्वरित संघ आहेत.
कोण कोणत्या गटात कोणते संघ :
गट अ – भारत, पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका
गट ब – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
गट क – इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, इटली, नेपाळ
गट ड – न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा
भारतात 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे सामने कुठं होतील?
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
ईडन गार्डन्स, कोलकाता
एमए.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वानखेडे स्टेडियम, मुंबई
श्रीलंकेत 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे सामने कुठं होतील?
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबो
टी-20 विश्वचषक 2026 संघ : भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, युएई.
टी-20 विश्वचषक 2026 चं वेळापत्रक :
7 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स. एसएससी, कोलंबो
7 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश. कोलकाता
7 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: भारत विरुद्ध अमेरिका. मुंबई
8 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान. चेन्नई
8 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: इंग्लंड विरुद्ध नेपाळ. मुंबई
8 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: श्रीलंका विरुद्ध आयर्लंड. प्रेमदासा, कोलंबो
9 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: बांगलादेश विरुद्ध इटली. कोलकाता
9 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: झिम्बाब्वे विरुद्ध ओमान. एसएससी, कोलंबो
9 फेब्रुवारी 2026. संध्याकाळी 7:00 वाजता: दक्षिण आफ्रिका विरुद्ध कॅनडा. अहमदाबाद
10 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया. दिल्ली
10 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: न्यूझीलंड विरुद्ध युएई. चेन्नई
10 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: पाकिस्तान विरुद्ध अमेरिका. एसएससी, कोलंबो
11 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान. अहमदाबाद
11 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड. प्रेमदासा, कोलंबो
11 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज. मुंबई
12 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: श्रीलंका विरुद्ध ओमान. कॅंडी
12 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: नेपाळ विरुद्ध इटली. मुंबई
12 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: भारत विरुद्ध नामिबिया. दिल्ली
13 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे. प्रेमदासा, कोलंबो
13 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: कॅनडा विरुद्ध युएई. दिल्ली
13 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: अमेरिका विरुद्ध नेदरलँड्स. चेन्नई
14 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: आयर्लंड विरुद्ध ओमान. एसएससी, कोलंबो
14 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश. कोलकाता
14 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका. अहमदाबाद
15 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ. मुंबई
15 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: अमेरिका विरुद्ध नामिबिया. चेन्नई
15 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: भारत विरुद्ध पाकिस्तान. प्रेमदासा, कोलंबो
16 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: अफगाणिस्तान विरुद्ध युएई. दिल्ली
16 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: इंग्लंड विरुद्ध इटली. कोलकाता
16 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका. कॅंडी
17 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा. चेन्नई
17 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे. कॅंडी
17 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: बांगलादेश विरुद्ध नेपाळ. मुंबई
18 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: दक्षिण आफ्रिका विरुद्ध युएई. दिल्ली
18 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: पाकिस्तान विरुद्ध नामिबिया. एसएससी, कोलंबो
18 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: भारत विरुद्ध नेदरलँड्स. अहमदाबाद
19 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता: वेस्ट इंडिज विरुद्ध इटली. कोलकाता
19 फेब्रुवारी 2026, दुपारी 3:00 वाजता: श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे. प्रेमदासा, कोलंबो
19 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: अफगाणिस्तान विरुद्ध कॅनडा. चेन्नई
20 फेब्रुवारी 2026, संध्याकाळी 7:00 वाजता: ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान. कॅंडी
त्यानंतर सुपर-8, उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.












