Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा षटकारांचा बादशाह… सर्वाधिक सिक्सर मारण्याचा केला विश्वविक्रम
Top News

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा षटकारांचा बादशाह… सर्वाधिक सिक्सर मारण्याचा केला विश्वविक्रम

Rohit Sharma celebrating after hitting a six, marking his world record for the most sixes in ODI cricket

Rohit Sharma most sixes ODI : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्मानं वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो वनडे क्रिकेटचा नवा सिक्सर किंग बनला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाला मागे टाकत रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. रांची इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहितने शाहिद आफ्रिदीचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला.

वनडे क्रिकेटमध्ये 352 षटकार :

रोहित शर्माच्या नावावर आता वनडे क्रिकेटमध्ये 352 षटकार आहेत. त्यानं 277 वनडे सामन्यांमधील 269 डावात ही कामगिरी केली. शाहिद आफ्रिदीनं 398 वनडे सामन्यांच्या 369 डावात 351 षटकार मारले होते. गेल्या 10 वर्षांपासून हा विक्रम शाहिद आफ्रिदीचा होता आणि आता रोहित शर्मानं तो मोडला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :

352* – रोहित शर्मा, भारत
351 – शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान
331 – ख्रिस गेल, वेस्ट इंडिज
270 – सनथ जयसूर्या, श्रीलंका
229 – एमएस धोनी, भारत

एका संघासाठी सर्वाधिक षटकार :

इतकंच नाही तर रोहित शर्मा एकाच संघासाठी 350 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. रोहितनं भारतासाठी वनडे सामन्यांमध्ये सर्व 351 षटकार मारले आहेत, तर शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानसाठी वनडे सामन्यांमध्ये 351 षटकारांपैकी 349 आणि आयसीसीसाठी 2 षटकार मारले आहेत.

 

एका संघासाठी सर्वाधिक वनडे षटकार :

352* – रोहित शर्मा, भारत
349 – शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान
330 – ख्रिस गेल, वेस्ट इंडिज
268 – सनथ जयसूर्या, श्रीलंका
222 – एमएस धोनी, भारत

रांचीमध्ये विराट आणि रोहित दोघांची दमदार फलंदाजी :

रांचीमध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या रुपात पहिली विकेट पडल्यानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारतीय डावाची सूत्रे हाती घेतली आणि जलद धावा काढल्या आणि शतकी भागीदारी पूर्ण केली. या दरम्यान, विराट कोहलीनं षटकार मारुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कोहलीनं 48 चेंडूत आपलं 76 वं वनडे अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर काही वेळातच, रोहितनं 43 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हिटमॅनच्या वनडे कारकिर्दीतील हे 60वं अर्धशतक आहे. 51 चेंडूत 57 धावा काढल्यानंतर मार्को जानसेनच्या चेंडूवर रोहित पायचीत झाला.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts