Tips for buying shoes : आपण खरेदीसाठी जातो तेव्हा त्याचा लूक, स्टाईल, रंगसंगती अशा अनेक बाबाईंचा विचार करतो. मग ती कपड्यांची खरेदी असो किंवा ज्वेलरी. परंतु आजकाल आपण शूज खरेदी करण्यासाठी जाताना या गोष्टींचा विचार सहसा करत नाही. परंतु शूज खरेदीवेळी स्टाईल कम्फर्ट आणि लुक्स अपग्रेड करणे गरजेचे आहे. कारण जर चुकीची शूज जोडीनं घेतली तर संपूर्ण आऊटफिट ची शोभा जाते.
जर तुम्ही कॅज्युअल आउटिंगला जाणार असाल किंवा सहलीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर चांगल्या क्वालिटीचे आणि परिपूर्ण फिटिंगचे बूट तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होतील. आणि तुमच्या पायाला देखील परफेक्ट बसतील. यासाठी शूज खरेदी करताना काही स्मार्ट टिप्सचा वापर करणे गरजेचे असते. जेणेकरून आपण परफेक्ट शूज खरेदी करू शकतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत या स्मार्ट टिप्स
बऱ्याचदा काही व्यक्ती बूट खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा फक्त बुटाच्या आकाराचा अंदाज घेऊन शूज खरेदी करतात. परंतु ही चुकीची पद्धत असून शूज खरेदी करत असताना पायांची लांबी, रुंदी दोन्ही बाबींचा विचार करून शूज खरेदी करणे आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही ब्रॅंडनुसार साईज चार्ट तपासून शूज खरेदी करू शकतात. शूज खरेदी करताना शूज मधील फॉरवर्ड स्पेस पाहणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्या बोटांना आरामात स्पेस मिळेल.
हे ही वाचा : बीटरूटचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास पिगमेंटेशन होईल कमी; जाणून घ्या फायदे
जर तुम्ही लॉन्ग बूट खरेदी करत असाल तर कफचे मोजमाप करून खरेदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी बूट पाय आणि पोटरी दोन्ही फिट असले तर तुम्हाला शूज परफेक्ट होतील. जर तुमचे पाय जाड किंवा पातळ असेल तर रुंद बूट किंवा अरुंद बूटाचा पर्याय तुम्ही निवडू शकतात. याशिवाय तळव्याची ताकत आणि पकड देखील यासाठी महत्वाची आहे. शूज मधील रबरचा पार्ट चांगला असेल, ट्याची पकड चांगली असेल तर शूज मजबूत असल्याचे मानले जातात. कारण ते शूज जास्त काळ टिकतात.






