Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सलग तिसऱ्या दिवशी शेअर मार्केट घसरणीसह बंद; सेन्सेक्स 275 तर निफ्टी 82 अंकांनी घसरला
बिजनेस

सलग तिसऱ्या दिवशी शेअर मार्केट घसरणीसह बंद; सेन्सेक्स 275 तर निफ्टी 82 अंकांनी घसरला

A stock market graph showing a downward trend, representing the fall in Sensex and Nifty for the third consecutive day

Stock market fall third day : भारतीय शेअर बाजारानं आज सलग तिसऱ्या दिवशीही घसरण सुरु ठेवली. आज सकाळी वाढीसह उघडलेला बाजार विक्रीच्या दबावामुळं लवकरच घसरणीच्या स्थितीत आला आणि शेवटपर्यंत घसरणीच्या स्थितीत राहिला. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स 84,391.27 वर बंद झाला, त्यात 275.01 अंकांनी (0.32%) मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 50 निर्देशांक देखील 25,758.00 वर बंद झाला, 81.65 अंकांनी (0.32%) मोठी घसरण झाली. सोमवार आणि मंगळवारीही बाजारात लक्षणीय घसरण झाली होती हे लक्षात घेतलं पाहिजे.

इटरनल शेअर्समध्ये मोठी घसरण :

मंगळवारी, सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त 10 समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 18 समभाग नुकसानासह लाल रंगात बंद झाले आणि दोन कंपन्या अपरिवर्तित बंद झाल्या. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 पैकी फक्त 19 कंपन्यांचे शेअर वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 31 कंपन्यांचे शेअर नुकसानासह लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा स्टील सर्वाधिक 0.87 टक्के वाढीसह बंद झाला, तर एटरनल सर्वाधिक 2.86 टक्के नुकसानासह बंद झाला.

हे ही वाचा : ‘विमानतळावर प्रवासी अडकले असताना सरकारनं काय केलं?’ इंडिगो संकटाबद्दल उच्च न्यायालयानं केंद्रासह विमान कंपन्यांना फटकारलं

सेन्सेक्सच्या कोणत्या कंपन्या हिरव्या रंगात बंद :

सेन्सेक्सच्या उर्वरित कंपन्यांमध्ये, सन फार्मा 0.75 टक्के, आयटीसी 0.55 टक्के, एनटीपीसी 0.48 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.43 टक्के, एचसीएल टेक 0.38 टक्के, पॉवरग्रिड 0.36 टक्के, एशियन पेंट्स 0.18 टक्के, मारुती सुझुकी 0.05 टक्के आणि अ‍ॅक्सिस बँक 0.04 टक्के वाढीसह बंद झाला. बुधवारी अदानी पोर्ट्स आणि टायटन अपरिवर्तित बंद झाले.

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद :

दुसरीकडे, ट्रेंटचे शेअर्स 1.66 टक्के, भारती एअरटेल 1.10 टक्के, इन्फोसिस 0.92 टक्के, टेक महिंद्रा 0.84 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.83 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.78 टक्के, एचडीएफसी बँक 0.65 टक्के, बजाज फायनान्स 0.64 टक्के, टीसीएस 0.63 टक्के, बीईएल 0.59 टक्के, टाटा मोटर्स पॅसेंजर 0.39 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.20 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.26 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.26 टक्के, एल अँड टी 0.23 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 0.11 टक्के आणि एसबीआयचे शेअर्स 0.06 टक्क्यांनी घसरुन बंद झाले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts