Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्रात भीक मागण्यास प्रतिबंध, दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर
ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भीक मागण्यास प्रतिबंध, दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर

Maharashtra Begging Ban Bill

Maharashtra Begging Ban Bill : राज्यात आता लवकरच भीक मागण्यास बंदी घालण्यात येणार आहे. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेमध्येही महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक मंजूर करण्यात आलं. परंतु सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असताना गोंधळाच्या स्थितीत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे तालिका सभापती नीलम गोन्हे, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरा यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यात भीक मागण्यास प्रतिबंध घालणारे विधेयक हे गोंधळाच्या स्थितीत विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. राज्याच्या मंत्री अदिती तटकरेंनी हे विधेयक मांडलं. त्यावर आमदार मनीषा कायंदे, अमोल मिटकरी आणि तालिका सभापती निलम गोर्डे यांनी असमाधान व्यक्त केलं. महारोगी शब्द वगळण्यासाठी आलेल्या विधेयकाचा आणि त्याचे शीर्षक यात ताळमेळ नसल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसेंनी दिली. तर, विधेयकाबाबत माहिती दिलेल्या पुस्तिकेतील स्पष्टीकरणावर तालिका सभापती नीलम गोन्हेंनी असमाधान व्यक्त केले.

हेही वाचा – भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, २०५० पर्यंत मुंबई मुस्लिमांच्या ताब्यात जाणार..

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर घेरलं..

सभागृहातील अनेक सदस्य असमाधानी असतानाही विधेयक मंजूर करण्यात आलं. या संबंधित विधान परिषद सभापतींच्या दालनात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी घेरल. त्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था विधेयकावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर ते विधानसभेत मंजूर करण्यात आलं.

राज्य सरकारचं शक्ती विधेयक केंद्र सरकारने नाकारलं

महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचं शक्ती विधेयक केंद्राने नाकरल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2020-21 मध्ये हे विधेयक विधिमंडळात मंजूर झालं, मात्र ते केंद्र सरकारने नाकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोबतच धर्मातरण आणि लव्ह जिहादविरोधी कायद्याबाबत पोलिस महासंचालकांच्या समितीचा अहवाल लवकरच सादर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts