Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • निवडणुका जाहीर होताच, संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी.. 
Top News

निवडणुका जाहीर होताच, संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी.. 

Sanjay Raut Press Conference

Sanjay Raut Press Conference : निवडणूक आयोगाने नुकतीच राज्यातील 29 महापालिकांची घोषणा केला आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यानुसार राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वत्र टीका केली आहे. तसेच त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत, अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोणत्याही पदावरच्या, वयाच्या माणसाने या लढाईत उतरायला हवं. आम्ही मुंबई भाजपच्या आणि अमित शहा यांच्या घशात जाऊ देणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील खर्चासाठी 15 लाखांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पण सत्ताधारी 15 लाखांपर्यंत मर्यादा पाळणार आहेत का? यासाठी राज्य निवडणूक आयोग काय करणार आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – उद्धव-राज या महापालिकांमधून एकत्र लढणार?… संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

मुंबईसह 29 महापलिकासाठी आम्ही सज्ज आहेत

पुढे बोलताना राऊत म्हणाले, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक या महापलिकासाठी एकत्र आले आहेत. बाकी ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ. मुंबईसह 29 महापलिकासाठी आम्ही सज्ज आहेत. इतिहासात नोंद राहिली पाहिजे, शिवसेना-मनसे मुंबई आणि मराठी माणसासाठी लढले. काँग्रेस सध्यातरी आमच्यासोबत नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की, स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. आम्ही सांगितलं भाजपाला मदत होईल असा करू नका.

या आठवड्यात ठाकरे बंधूंची युती जाहीर करणे अपेक्षित

आम्ही बघू कधी युती जाहीर करायची, या आठवड्यात ठाकरे बंधूंची युती जाहीर करणे अपेक्षित आहे. तुम्ही महायुतीला विचारता का तुम्ही युती करणार का? मराठीसाठी संघर्ष झाला तर बलिदान द्यायला तयार आहोत. रहेमान डकैत कोण आहेत?, हे मुंबईला माहिती आहे. आदित्य ठाकरे आज मेळावा घेताय. पक्षासाठी महत्त्वाच्या जबाबदार्‍या ते घेताय. ही निवडणूक तरुणांची आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या जबाबदार्‍या दिल्या असतील. मेळावे घेत असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो. सर्व घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोग तारखा जाहीर करतंय हा आचारसंहितेचा भंग नाही का? मुंबईत काल सगळीकडे मराठी माणसाला साद घालण्यासाठी बॅनर लागले होते. ते पालिकेकडून काढून टाकण्यात आले. पोस्टर्स लावल्याने सरकारला भीती वाटतेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टीने पुढील काही दिवस संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला महत्त्व प्राप्त झालं आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts