Motorola Edge 70 launch India : भारतात मोटोरोला कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन motorola edge 70 लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन edge सिरीजचा लेटेस्ट आणि प्रीमियम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन कंपनीने युजर्सला विचारात घेऊन तयार करण्यात आला असुन हा स्मार्टफोन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.
Motorola edge 70 हा स्मार्टफोन स्टाईल, परफॉर्मेंन्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी या सर्वांचा विचार करून तयार करण्यात आला असून आजच्या पिढीला हा स्मार्टफोन प्रचंड पसंतीस पडतो. या स्मार्टफोनमध्ये तीन कलर ऑप्शन मिळणार आहे. त्यानुसार Pantone कलर ऑप्शन्स कंपनीने सादर केला असून या स्मार्टफोनचा लूक एकदम प्रीमियर दिसत आहे.
कसा आहे स्मार्टफोन
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच 1.5 K AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट देतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4,500 निट्सचापीक ब्रायटनेस देतो. हा स्मार्टफोन HDR10+ आणि डॉल्बी व्हीजन दोन्हीला सपोर्ट करतो. जर तुम्ही गेमिंग लव्हर्स असाल तर या स्मार्टफोनमध्ये गेम खेळण्याचा अनुभव खूपच शानदार मिळू शकतो. स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यामध्ये Gorilla Glass 7i देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली असून पाणी आणि धुळीपासून हा फोन सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद; ‘या’ शेअर्समध्ये लक्षणीय घसरण
स्टोरेज
motorola edge 70 हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर ने सुसज्ज आहे. जो कि, वेगवान आणि स्मूथ परफॉर्मेंन्ससाठी अप्रतिम आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 GB LPDDR5x रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 16 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 android अपडेट्स देण्यात आले असून 4 वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
कसा आहे कॅमेरा
motorola Edge 70 या स्मार्टफोन मध्ये देण्यात आलेला कॅमेरा बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून एक स्क्वेअर शेप कॅमेरा मोड्यूल आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून हा कॅमेरा ऑप्टीकल इमेज स्टेबिलायझेन (OIS) सह उपलब्ध आहे. यासह दुसरा कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वेडज कॅमेरा असून हा एक थ्री इन वन लाईट सेंसर सह येतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
The motorola edge 70 redefines ultra-slim craftsmanship with an impossibly thin 5.99mm design.
Sale starts 23rd December at ₹28,999*#MotorolaEdge70 #Motorola #ImpossiblyThinYetUncompromised pic.twitter.com/IDD1Oci0Yj
— Motorola India (@motorolaindia) December 15, 2025
कमी वेळात होतो चार्ज
motorola edge 70 या स्मार्टफोनमध्ये 5000 मेगाहर्ट्झची सिलिकॉन कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 31 तासांपर्यंत लागोपाठ व्हिडीओ प्लेबॅकसाठी सक्षम आहे. या स्मार्टफोनमध्ये 68W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जींगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे कमी वेळात हा स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो.
किती आहे या स्मार्टफोनची किंमत
motorola edge 70 या स्मार्टफोनची किंमत 29 हजार 999 रुपये इतकी आहे. सध्या हा स्मार्टफोन एकाच व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिएंटमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 23 डिसेंबर पासून flipkart , motorola India च्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. तर देशातील सर्व ऑफलाईन स्टोअरवर देखील हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.






