Indian films on Oscar list before Homebound : आगामी 98 व्या अकादमी पुरस्कारासाठी निलेश घायवान यांचा होमबाऊंड चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या विभागासाठी पात्र ठरला असून या चित्रपटाचा top 15 मध्ये समावेश झाल्याची माहिती शेअर करण्यात आली.
ऑस्कर 2026 साठी होमबाऊंड हा चित्रपट शॉर्टलिस्ट होणे हे भारतासाठी महत्वाचा टप्पा आहे. हा चित्रपट भारतासाठी अधिकृत ऑस्कर एंट्री ठरला आहे. होमबाऊंड चित्रपट अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेस ने जगभरातील 83 चित्रपटातून निवडले असून आता शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांची अंतिम नॉमिनेशन 22 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. हा ऑस्कर सोहळा 15 मार्च रोजी डॉल्बी थिएटर, हॉलिवूड मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे 15 चित्रपट ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट
भारताच्या होमबाऊंड चित्रपटासह अर्जेंटिना येथील Belen , ब्राझील चा THE Secret Agent , फ्रान्सचा It Was Just An असिसिडेन्ट, जर्मनीचा Sound of Falling यासारख्या इतर देशातील चित्रपटांना ऑस्कर 2026 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. होमबाउंड या चित्रपटाने यापूर्वी कान्स 2025 , TIFF मध्ये भव्य प्रेझेन्टेशन देत International Audience Choice या अवॉर्डसाठी Second Runner Up मध्ये स्थान पटकावले आहे.
हे ही वाचा : नीरज घायवानचा ‘होमबाऊंड’ ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट
यापूर्वी ऑस्करसाठी नॉमिनेटेड चित्रपट
यापूर्वी ऑस्कर म्हणजे अकादमी पुरस्कारासाठी भारतातील फक्त 3 चित्रपट नॉमिनेट झालेले आहे. तर टॉप 15 मध्ये आलेले भारतीय चित्रपटांमध्ये एका गुजराती चित्रपटाचा समावेश आहे. ऑस्कर पुरस्कारसाठी नॉमिनेट झालेल्या भारतीय चित्रपटांपैकी पहिला चित्रपट म्हणजे मदर इंडिया.
मदर इंडिया
हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिगदर्शित केला होता. हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार यादीत top 5 मध्ये आला होता परंतु एका मताने हा चित्रपट ऑस्कर जिंकण्यापासून वंचित राहिला. आणि ऑस्कर पुरस्कार मदर इंडिया ऐवजी नाईट ऑफ कॅबिरिया या चित्रपटाला गेला.
सलाम बॉम्बे
ऑस्कर टॉप 5 च्या यादीत आलेल्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे, सलाम बॉम्बे हा चित्रपट मीरा नायर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 1988 साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली होती. हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट झाला होता परंतु हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार जिंकू शकला नाही.
लगान
2001 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झालेला लगान चित्रपट देखील ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेट झाला होता. परंतु हा चित्रपट देखील ऑस्कर जिंकू शकला नाही. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले असून हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व भारत आणि क्रिकेट यावर आधारित आहे. हा चित्रपट देखील अंतिम फेरीत पोहोचला होता.
#Homebound has been shortlisted for Best International Feature Film at the 98th Academy Awards! @TheAcademy
We’re deeply grateful for the extraordinary love and support we’ve received from around the world. pic.twitter.com/2dgXjh57Wx
— Neeraj Ghaywan (@ghaywan) December 16, 2025
chhello show (shortlisted)
ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांमध्ये द लास्ट फिल्म शो chhello show देखील शॉर्टलिस्ट झाला होता. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक पॅन नलीन हे आहे. परंतु हा चित्रपट टॉप 5 मध्ये येऊ शकला नाही.
त्यानंतर आता होमबाउंड चित्रपटाने ऑस्कर पुरस्करासाठी top 15 मध्ये स्थान मिळवले आहे. आता टॉप 5 मध्ये हा चित्रपट येईल का याकडे सर्वांची उत्सुकता लागून आहे. जर या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकला तर हा भारताचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला चित्रपट ठरेल.
काय आहे चित्रपटाची कथा
होमबाउंड या भारतीय चित्रपटात ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची मुख्य भूमिका असून करण जोहर, आदर पुनावाला आणि अपूर्वा मेहता यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटाची कथा ही बालमित्र शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन (विशाल जेठवा) यांच्याभोवती फिरताना दिसते. चित्रपटातील हे दोन पात्र पोलीस भरतीचे स्वप्न उराशी घेऊन चालत असतात. हे स्वप्न त्यांच्या आयुष्यला दिशा देण्याचे काम करते. चित्रपटातील जान्हवी कपूरची भूमिका मैत्री, कर्तव्य आणि खास म्हणजे आजच्या या तरुण भारतासमोरील दबाव यांची भावनिक मांडणी दाखवण्यात आली आहे.












