Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकी खेळी; पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून श्रीलंकेचा पराभव
क्रीडा

जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकी खेळी; पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून श्रीलंकेचा पराभव

Jemimah Rodrigues celebrates her half-century during the first T20 match against Sri Lanka

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा 8 विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं भारतीय संघासमोर 122 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय महिला संघानं हे लक्ष्य 14.4 षटकांत 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यात भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जनं सामना जिंकून देणारी खेळी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आता 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हे ही वाचा : भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आज भिडणार; अंडर 19 आशिचा चषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने

श्रीलंकेच्या फलंदाजांना काढत्या आल्या नाही धावा :

]भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेकडून चामारी अटापट्टू आणि विश्मी गुणरत्ने यांनी डावाची सुरुवात केली. क्रांती गौडनं श्रीलंकेच्या कर्णधार चामारी अटापट्टूला गोलंदाजी करताना भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. चामारी 12 चेंडूत 15 धावा काढून बाद झाली. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी खूप संथ फलंदाजी केली. दीप्ती शर्मानं हसिनी परेराला बाद करुन श्रीलंकेच्या संघाला दुसरा धक्का दिला. 23 चेंडूत दोन चौकारांसह 20 धावा काढून हसिनी बाद झाली. दोन विकेट पडल्यानंतर हर्षिता चांगली फलंदाजी करत होती, पण श्री चरणीनं तिला बाद केले. हर्षिता 23 चेंडूत दोन चौकारांसह 21 धावा काढून बाद झाली. विश्मीनं 43 चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 39 धावा केल्या आणि संघाची सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज ठरली. भारताकडून क्रांती गौड, दीप्ती शर्मा आणि श्री चरणीनं प्रत्येकी एक बळी घेतला.

 

भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकी खेळी :

लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताची सुरुवात शेफाली वर्माच्या रुपात खराब झाली. शेफालीला काव्या कविंदीनं 9 धावांवर बाद केलं. मात्र, मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी नंतर चांगली भागीदारी केली. इनोकानं मंधानाला बाद केलं. तिनं 25 चेंडूत चार चौकारांसह 25 धावा केल्या होत्या. तिनं आणि जेमिमानं दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरमनप्रीत कौरनं जेमिमासोबत खेळली. दोन्ही फलंदाजांनी भारतासाठी विजय मिळवून दिला. जेमिमाहनं 44 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या, तर हरमनप्रीत कौर 15 धावांवर नाबाद राहिली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts