Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मंत्री राणेंसह लाड, दरेकरांना न्यायालयाकडून अजामीपात्र अटक वाॅरंट जारी
Top News

मंत्री राणेंसह लाड, दरेकरांना न्यायालयाकडून अजामीपात्र अटक वाॅरंट जारी

Non-bailable arrest warrant issued
97

Non-bailable arrest warrant issued : न्यायालयाचा आदेश धुडकावून लावणे भाजपच्या नेत्यांना चांगलचं भोवलं आहे. कोरोना कालावधीतील एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिला.

हेही वाचा – पवारांच्या निष्ठावंताने साथ सोडली! जगताप यांच्या राजीनाम्याने पुण्यात हादरा

राज्याचे कैबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तसेच संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जून २०२१ रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

राणे बंधु, राजन तेली यांच्यासह ४२ जणांवर गुन्हे दाखल

सिंधुदुर्गात राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी, न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित होते.

तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

नितेश राणे यांच्यासह अन्यजण गैरहजर होते. मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला आहे. त्यामुळे, मंत्री महोदयांना कोर्टाकडून दणका देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts