Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात; देशातील पहिली शिक्षा
Mumbai

कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात; देशातील पहिली शिक्षा

Warning sign and pigeons at a public place after action against feeding pigeons in India

feeding pigeons punishment India : मुंबईतील दादर येथे असलेला कबुतरखाना काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात पेटले होते. आता पुन्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर पुन्हा एकदा काही व्यापारींनी या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले. आता या व्यापारांना कोर्टाने चांगलीच दंडात्मक शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण

मुंबई महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त मुंबईच नाही तर अनेक ठिकाणी असलेला कबुतरखाना देखील बंद करण्यात आला होता. या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झाला होता. आणि अनेक जण रस्त्यावर उतरले होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. या निर्णयानंतर देखील अनेक जण दादर परिसरात कबुतरांना दाणे टाकताना दिसले. त्यापैकी एक म्हणजे दादर परिसरात राहणारे व्यापारी नितीन शेठ. यांनी देखील कबुतरांना दाणे टाकले. त्यांना न्यायालयाने दोषी ठरव दंड ठोठावला. ही भारतातील कबुतरांना दाणे खाऊ घातल्यामुळे ठोठावण्यात आलेली पहिली शिक्षा आहे.

हे ही वाचा : केरळमध्ये पहिल्यांदाच फुललं कमळ! डाव्यांचा बालेकिल्ला भेदत पहिल्यांदाच बनला भाजपाचा महापौर

व्यापाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला

दादर येथे राहणारे नितीन शेठ हे व्यापारी आहेत. दादर परिसरात असलेला कबुतरखाना बंद पाडल्यानंतर देखील त्यांनी त्याचठिकाणी कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले होते. याप्रकरणी पोलिसांकडून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी त्यांची चूक मान्य केली असून आता त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी बंदी असताना देखील कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकळ्यासंदर्भात आलेल्या तक्रारींच्या आधारावर या व्यापारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

5 हजार रुपये दंड

या प्रकरणात व्यापारी नितीन शेठ यांना कोर्टाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी निकाल दिला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 (ब) आणि बीएनएसचे कलम 271 अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. ही भारतातील पहिली शिक्षा आहे. त्यामुळे लोकांनी भविष्यात असे कृत्य करू नये असे मत न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts