Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • केरळमध्ये पहिल्यांदाच फुललं कमळ! डाव्यांचा बालेकिल्ला भेदत पहिल्यांदाच बनला भाजपाचा महापौर
ताज्या बातम्या

केरळमध्ये पहिल्यांदाच फुललं कमळ! डाव्यांचा बालेकिल्ला भेदत पहिल्यांदाच बनला भाजपाचा महापौर

first BJP Mayor in Kerala

First BJP Mayor in Kerala : केरळमध्ये भारतीय जनता पक्षानं इतिहास रचला आहे. तिरुअनंतपुरमच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार व्ही.व्ही. राजेश यांनी विजय मिळवला आहे. तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या सध्याच्या संख्येपेक्षा एक मत जास्त म्हणजे व्ही.व्ही. राजेश यांना 51 मतं मिळाली. डाव्या विचारसरणीच्या आघाडीच्या एलडीएफ उमेदवाराला 29 मतं मिळाली, तर विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ उमेदवाराला फक्त 17 मतं मिळाली. भाजपाच्या विजयामुळं या दक्षिणेकडील राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी जाहीर केलं की आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ.

भाजपाचे पहिले महापौर :

व्ही.व्ही. राजेश हे तिरुअनंतपुरम महानगरपालिकेचे पहिले भाजपा महापौर बनले आहेत. 45 वर्षांच्या डाव्या राजवटीचा अंत होऊन या पदावरील पक्षाचा हा पहिला विजय आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस एस. सुरेश यांनी नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक आणि जिल्हा पक्ष नेत्यांच्या बैठकीत ही नावं जाहीर केली. पक्षाच्या राज्य आणि जिल्हा नेतृत्वात प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. केरळच्या राजधानीत राजेश यांची महापौरपदी निवड भाजपासाठी एक प्रतीकात्मक कामगिरी मानली जात आहे. राज्याच्या शहरी राजकारणात हा एक मोठा बदल म्हणूनही पाहिला जात आहे.

व्ही.व्ही. राजेश कोण आहेत? :

यापूर्वी, निवृत्त पोलिस महासंचालक (डीजीपी) आर. श्रीलेखा यांचा महापौरपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून विचार केला जात होता, परंतु पक्षातील एका गटानं त्यांच्या बढतीला विरोध केला होता. अखेर, भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर, राजेश यांच्या नावावर एकमत झालं. व्ही.व्ही. राजेश यांनी दोन वेळा नगरसेवक, राज्य सचिव, माजी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि माजी भाजपा तिरुवनंतपुरम जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ते विरोधी पक्षाचे डी फॅक्टो नेते होते. त्यांनी सीपीआयएम शासित महानगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुद्ध सत्याग्रह केला.

कोणाला किती जागा मिळाल्या? :

भाजपानं चार दशकांपासून चालत आलेला डाव्या पक्षाचा बालेकिल्ला मोडून 50 जागा जिंकून तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर नियंत्रण मिळवलं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) नं देखील लक्षणीय वाढ केली, त्यांच्या जागांची संख्या दुप्पट केली. एलडीएफनं 100 पैकी 29 वॉर्ड जिंकले, तर यूडीएफची संख्या 19 झाली. अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या, तर एका वॉर्डमध्ये अपक्ष उमेदवाराच्या निधनामुळं मतदान पुढं ढकलण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts