Naxalites Killed : छत्तीसगडमधून सध्याची मोठी बातमी येत आहे. शनिवारी सकाळी सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत एकूण 14 नक्षलवादी मारले गेले. सुकमा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बारा जण ठार झाले, तर विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोघे ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी पहाटे 5 वाजल्यापासून या भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एकूण 14 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
सुकमामध्ये 12 नक्षलवाद्यांचा मृत्यू (naxalites killed) :
शनिवारी छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुकमामध्ये 12 हून अधिक नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला, तर शेजारच्या विजापूर जिल्ह्यात पहाटे दोन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुकमा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागातील जंगलात गोळीबार झाला, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांचं एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर होते. ते म्हणाले, “आतापर्यंत 12 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. ही कारवाई सुरु आहे आणि अधिक माहिती नंतर दिली जाईल.”
विजापूरमध्येही दोन नक्षलवादी मारले गेले :
दुसऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, विजापूरमध्ये, जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागातील जंगलात गोळीबार झाला, जेव्हा राज्य पोलिसांच्या एका तुकडीच्या जिल्हा राखीव रक्षक दलाचं पथक पहाटे 5 वाजता अशाच प्रकारच्या कारवाईवर होते. घटनास्थळावरून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याचं त्यांनी सांगितलं. अधूनमधून गोळीबार सुरु असल्याचे आणि अधिक माहितीची वाट पाहत असल्याचे अधिकाऱ्यानं सांगितलं. गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकीत 285 नक्षलवादी मारले गेले होते.







